चारचाकी व दुचाकी वाहनांची चोरी करणारा सराईत गुन्हेगार मुद्देमालासह जेरबंद

0 222

अहमदनगर – अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेने (Ahmednagar Local Crime Branch) कारवाई करून  अकोले संगमनेर, श्रीरामपूर, नेवासा, सोनई, शेवगांव परिसरातून तसेच जालना, नाशिक आणि औरंगाबाद जिल्ह्यातुन चारचाकी (Four-wheeler) व दुचाकी (two-wheeler ) वाहनांची चोरी करणारा सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. या कारवाईत १४ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. संजय रावसाहेब चव्हाण असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.  (Four-wheeler and two-wheeler thief arrested in Sarait)

या प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सादिक इब्राहिम पठाण (४९ वर्षे,रा. काझीबाबा रोड, सुलतान नगर, ता. श्रीरामपूर) यांचा सुपर ऑटो कंसल्ट या नावाने जुने चारचाकी वाहनांचे खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांचे ओळखीचे जनार्दन रामचंद्र बाबर (रा. भिंगार, ता. जि. अहमदनगर) यांनी त्यांची महिंद्रा बोलेरो मालवाहतुक गाडी क्र. एमएच/१६/एवाय / ४७९० ही विक्री करण्यासाठी गाडीचे कागदपत्रासह  सादिक यांचेकडे दिली होती. ही पिकअप सादिकने त्यांचे श्रीरामपूर येथील कार्यालयाचे समोर उभी केली असतांना नोव्हेंबर 16 रोजीचे रात्री कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरुन नेली होती. या घटनेनंतर श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात भादविक ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदरची घटना घडल्यानंतर मा. विशेष पोलीस उपमहानिरीक्षक सो., नाशिक परिक्षेत्र, नाशिक यांचे सुचना व मार्गदर्शना नुसार, मा. पोलीस अधीक्षक सो, अहमदनगर यांनी सदर गुन्ह्याचे तपासकामी स्वतंत्र पथक नेमून आरोपींचा शोध घेवून गुन्हा उघडकीस आणण्याच्या सुचना दिल्या.त्याप्रमाणे पोनि/ अनिल कटके यांनी सदर गुन्ह्याचे तपासकामी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे स्वतंत्र पथक नेमले. पथकातील अधिकारी व अंमलदार हे सदर गुन्ह्याचा समांतर तपास करुन आरोपींची माहिती घेत असताना पोनि अनिल कटके यांना गुप्त खबऱ्याकडून खात्रीशीर माहिती मिळाली कि, सदरचा गुन्हा हा संजय रावसाहेब चव्हाण (रा. ब्राम्हणगांव, ता. श्रीरामपूर ) याने व त्यांचे साथीदारांनी मिळून केला असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने पथकातील सपोनि /सोमनाथ दिवटे, पोहेकॉ/मनोज गोसावी, पोना/संतोष लोढे, दिपक शिंदे, शंकर चौधरी, रवि सोनटक्के, पोकॉ/रविंद्र घुंगासे, रणजीत जाधव, सागर ससाणे, जालिंदर माने, चापोहेको/उमाकांत गावडे, पोना/भरत बुधंवत अशांनी मिळून आरोपींचे ठावठिकाणा बाबत गोपनिय माहिती घेवून सापळा लावून आरोपी संजय रावसाहेब चव्हाण,  यास ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या आरोपीकडे वर नमुद गुन्ह्याबाबत कसून चौकशी केली असता त्यांने त्याचा साथीदारासह गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यास अधिक विश्वासात घेवून विचारपुस केली असता त्याने वर नमुद गुन्ह्यातील ३ लाख ३५ हजार रु. किंमतीचा मुद्देमाल महिंद्रा बोलेरो मालवाहतुक गाडी क्र. एमएच /१६ / एवाय / ४७९० काढुन दिल्याने ती जप्त करण्यात आलेली आहे.

Related Posts
1 of 1,481
तसेच आरोपीने अशा प्रकारचे  कोठे गुन्हे केलेले आहेत या बाबत कसुन चौकशी केली असता त्यांने शेवगांव, नेवासा, सोनई, अंबड, जिल्हा जालना, पेटण, जिल्हा औरंगाबाद या ठिकाणाहुन यापुर्वी डीव्हीआर, मोबाईल, कॉम्प्युटर, मोटार सायकल, पिकअप अशा वाहनांची व साहित्यांची चोरी केल्याची कबुली दिल्याने त्या बाबत संबंधीत पोलीस स्टेशनला दाखल गुन्हयांबाबत खात्री केली असता खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहे.या गुन्ह्याची चौकशी करून  एकुण १४ लक्ष ६० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल आरोपीकडुन जप्त करण्यात आले आहे.वरील नमुद आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्यांचे विरुध्द यापुर्वी दरोडा, दरोड्याची तयारी, घरफोडी, खुनाचा प्रयत्न व चोरी अशा स्वरुपाचे एकुण २५ गुन्हे संगमनेर, अकोले, नेवासा, शेवगांव, श्रीरामपूर, सोनई तसेच जालना, नाशिक व औरंगाबाद जिल्हयात दाखल असुन आरोपीस मुद्देमालासह श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असुन, पुढील कारवाई श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन करीत आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: