रस्त्याने जाणान्या प्रवाशाची हत्या करणारे चार तृतियपंथी आणि त्यांचे चार साथीदारांना अटक

0 382

अहमदनगर –   गणेशनगर फाटा, ता. राहाता येथे पैसै न दिल्याचे कारणावरुन रस्त्याने जाणान्या प्रवाशाची ( passenger ) हत्या करणारे चार तृतियपंथी आरोपी आणि त्यांचे चार साथीदारांना अहमदनगर  गुन्हे शाखेने कारवाई करत १२ तासांचे आत अटक केली आहे .  स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या या कारवाईत  सचिन उत्तम जाधव उर्फ संचिता तमन्ना पवार, विकास दशरथ धनवडे उर्फ रुपाली सलोनी शेख , आनंद फौजी शेलार उर्फ रुचीरा सलोनी शेख,लक्ष्मण शंकर वायकर उर्फ लक्ष्मी सलोनी शेख , अभिजीत उर्फ गोट्या बाळू पवार ,गौरव उर्फ सनि भागवत पवार, राहूल उत्तम सोनकांबळे, अरबाज सत्तार शेख या सर्व आरोपीना खंडाळा, श्रीरामपूर, नायगाव, कोल्हार अशा वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यात घेतले.

मिळालेल्या माहिती नुसार दि. ५ सप्टेंबर रोजी  महेश दिलीप आभाळे यांचे वडील दिलीप आभाळे हे व त्यांचे मित्र निवृत्ती ऊर्फ नंदू चांगदेव क्षिरसागर असे दोघे गणेशनगर येथे पेट्रोल भरण्यासाठी जात असताना गणेशनगर फाटा येथे काही तृतिय पंथीयांनी महेशच्या वडीलांना अडवून पैशाची मागणी केली होती. त्यावरुन तृतियपंथी व  दिलीप आभाळे यांच्यात वाद झाले होते. त्याचा राग मनात धरुन तृतिय पंथीयांनी त्याच दिवशी त्यांचे इतर साथीदारासह एकरुखे गावामध्ये जावून दिलीप आभाळे व निवृत्ती ऊर्फ नंदू चांगदेव क्षिरसागर यांना लाकडी दांडक्याने व लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली होती. त्यानंतर  महेश याने    आपल्या  वडीलावर औषध उपचार चालू असताना ते दि. १६ सेप्टेंबर रोजी मयत झाले. सदर घटनेबाबत महेश याने राहाता पो.स्टे. येथे दिलेल्या फिर्यादी वरुन गुरनं. २५१ / २०२१, भादवि कलम ३०२, १४३, १४७, १४८, १४९ प्रमाणे आरोपी नामे सचिन उत्तम जाधव उर्फ संचिता तमन्ना पवार, रा. श्रीरामपूर व त्याचे नऊ साथीदाराविरुध्द दाखल करण्यात आला होता.
Related Posts
1 of 1,603
सदरचा गुन्हा दाखल झाल्यांनतर मा. पोलीस अधीक्षक मनोज पाटील अहमदनगर, अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर, उपविभागीय पोलीस अधिकारी, शिर्डी विभाग, पोनि/अनिल कटके, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांनी गुन्हा घडले ठिकाणी एकरुखे, ता. राहाता येथे भेट देवून घटनेची व आरोपींची माहिती घेतली. त्यानंतर पोलीस अधिक्षक  मनोज पाटील अहमदनगर यांचे आदेशाने सदर गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेणेकामी पोनि/ अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे स्वतंत्र पथक नेमून आरोपींचा शोध घेण्याबाबत सूचना दिल्या.
त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोसई/ सोपान गोरे, सफो / मन्सूर सय्यद, पोहेकॉ/ भाऊसाहेब काळे, विजयकुमार वेठेकर, मनोहर गोसावी, पोना/शंकर चौधरी, दिलीप शिंदे, रवि सोनटक्के, संतोष लोढे, पोकॉ/विनोद मासाळकर, रोहिदास नवगिरे, मयूर गायकवाड, चालक पोहेकॉ/संभाजी कोतकर अशांनी मिळून गुन्ह्यातील आरोपींचे ठावठिकाणाबाबत गोपनिय माहिती घेवून व मिळालेल्या माहितीचे आधारे आरोपीतांचा शोध घेवून प्रथम आरोपी नामे १) सचिन उत्तम जाधव उर्फ संचिता तमन्ना पवार, वय- २६ वर्षे, रा. सुभाष कॉलनी, वार्ड नं. ६, श्रीरामपूर यांस ताब्यात घेतले. त्यास विश्वासात घेवून गुन्ह्यातील इतर साथीदार आरोपी बाबत कसून चौकशी केली असता त्याने दिलेल्या माहितीचे व तांत्रीक विश्लेषणाचे आधारे उर्वरित आरोपीतांचा शोध घेवून आरोपी नामे २) विकास दशरथ धनवडे उर्फ रुपाली सलोनी शेख, वय- २५ वर्षे, रा. सदर, ३) आनंद फौजी शेलार उर्फ रुचीरा सलोनी शेख, वय- २० वर्षे, सदर, ४) लक्ष्मण शंकर वायकर उर्फ लक्ष्मी सलोनी शेख, वय- २० वर्षे, रा. इंदीरानगर, कोपरगाव, ५) अभिजीत उर्फ गोट्या बाळू पवार, वय २३ वर्षे, रा. खंडाळा, ता. श्रीरामपूर, ६) गौरव उर्फ सनि भागवत पवार, वय- १९ वर्षे, रा. खंडाळा, ता. श्रीरामपूर, ७) राहूल उत्तम सोनकांबळे, वय- २२ वर्षे, रा. खंडाळा, ता. श्रीरामपूर, ८) अरबाज सत्तार शेख, वय- १९ वर्षे, रा.खंडाळा, ता. श्रीरामपूर या सर्वांना खंडाळा, श्रीरामपूर, नायगाव, कोल्हार अशा वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यात घेतले. तसेच वरील नमुद आरोपींचा आणखी एक साथीदार ९) इरफान रज्जाक शेख, रा. खंडाळा, ता. श्रीरामपूर याचा शोध घेतला. पंरतू तो मिळून आला नाही.

वरील नमुद ताब्यात घेतलेले आरोपीकडे गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केला असल्याची माहिती दिल्याने आरोपींना राहाता पो.स्टे. येथे हजर करण्यात आले आहे. पुढील कार्यवाही राहाता पो.स्टे. करीत आहेत.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: