वंचित बहुजन आघाडीच्या समीक्षा व संवाद मेळाव्यामध्ये चारशे महिलांचा पक्षात प्रवेश

0 109

अहमदनगर –   आशीर्वाद लॉन येथे  पार पडलेल्या वंचित बहुजन आघाडीच्यासमीक्षा व संवाद मेळाव्यामध्ये  महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली चारशे महिलांनी पक्षात प्रवेश केला आहे.  या मेळाव्यात अहमदनगर दक्षिण- उत्तर विभागाचे जिल्हा,तालुका, शहर शाखेचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच महिला आघाडीचे, वाहतूक संघटना, माथाडी कामगार संघटना, ऊसतोड कामगार संघटना, युवा आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोण कोणती कामे करण्यात आली याचा आढावा घेतला असता अहमदनगर जिल्ह्यात अद्याप पर्यत पक्ष संघटनेने चांगल्या पद्धतीचे काम केलेले आहे. परंतु अहमदनगर जिल्हा हा साखर सम्राटांचा आहे. येथे काम करताना बऱ्याच अडचणी येत असतात ज्याला याचा सामना करायचा असेल तर सुनियोजित योजना आखल्या पाहिजे. त्या साठी कार्यकर्त्यांनी आज पासून कामाला लागणे गरजेचे आहे. पक्ष साठे काम करत असताना संघटन वाडी साठी कोणत्याही प्रकारचे बेशिस्त पना खपवून घेनार नाही असे रेखाताई ठाकूर कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाले.

WhatsApp चॅट हिस्ट्री होणार सहज ट्रान्सफर, व्हॉट्सअ‍ॅप आणणार नवीन फिचर

Related Posts
1 of 1,640

 येणाऱ्या कळते जर आपल्याला यश मिळवाचे असेल पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना मतभेद बाजूला ठेऊन निस्वार्थपणे संघटना वाधीचे काम करावे लागेल. या प्रसंगी महिला प्रदेश महासचिव अरुणाताई शिरसाठ, प्रदेश उपाध्यक्ष गोविंद दळवी, प्रदेश उपाध्यक्ष किसान चव्हाण सह जिल्यातील विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. मेळावा यशस्वी करण्यासाठी जिल्हाध्यक्ष प्रतीक बारसे व संघटनेचे जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी विशेष प्रयत्न केले.

हे पण पहा – आमदारांच्या दबावातून गुन्हा, काळेंनी दाखवली सीडी पुन्हा दिले जाहीर आव्हान

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: