जमिनीच्या वादातून खून केल्याप्रकरणी चार आरोपींना जन्मठेप

0 272

बीड –  अंबाजोगाई (Ambajogai) तालुक्यातील तडोळा शिवारात शेतकऱ्यासह साक्षीदाराचा जमिनीच्या वादातून( land dispute)  खून (murder) केल्याप्रकरणी चार आरोपींना जन्मठेपेची शिक्षा तर साक्षीदाराला जखमी केल्याप्रकरणी इतर दोघांना दोन वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा अतिरिक्त जिल्हा न्या.एम. बी. पटवारी यांनी सुनावली आहे.(Four convicts sentenced to life in land dispute)

या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार वसंत मुकुंदराव कराड (रा. वांगदरी, जि. लातूर) यांनी आपल्या शेतामध्ये ऊसलागवड केलेली होती. 16 एप्रिल 2012 रोजी कराड यांच्या शेतातील ऊस तोडून घेऊन जाताना शेजाऱ्यांशी वाद झाला. यावेळी आरोपींनी कोयता आणि कुऱ्हाडीने त्यांच्या डोक्यात, पाठीवर गंभीर जखमा केल्या व साक्षीदार गणेश गंभिरे तसेच तत्कालीन सरपंच बबन कराड यांनासुद्धा मारहाण केली.

या हल्ल्यात वसंत मुकुंदराव कराड, लक्ष्मण गंभिरे, गणेश गंभिरे, बबन कराड हे गंभीररीत्या जखमी झाले होते. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जखमींना अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता वसंत मुकुंदराज कराड यांना डॉक्टरांनी घोषित केले, तर उपचारादरम्यान लक्ष्मण नरहरी गंभिरे यांचा मृत्यू झाला. गणेश सुदाम गंभिरे यांच्या फिर्यादीवरून बर्दापूर ठाण्यात तडोळा येथील ११ आरोपींविरोधात कलम ३०२, ३०७, ३२६, ३२४ भादंविसह गुन्हा दाखल करण्यात आला होता.

बर्दापूर पोलिसांनी तपास करून दोषारोपपत्र अंबाजोगाईच्या अतिरिक्त जिल्हा न्यायालयात दाखल केले. उत्तरीय तपासणी अहवाल व सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून अतिरिक्त जिल्हा न्या. एम. बी. पटवारी यांनी मदन ग्यानदेव पुजारी व महादेव ग्यानदेव पुजारी यांना वसंत कराड यांच्या खुनाबद्दल दोषी धरून जन्मठेप व दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला. तसेच हल्लाकरतेवेळी भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या लक्ष्मण नरहरी गंभिरे यांच्या खून प्रकरणात बळीराम ग्यानदेव पुजारी व अंकुश ग्यानदेव पुजारी यांनादेखील जन्मठेप व दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे .

Related Posts
1 of 1,487

स्विमिंग पूलजवळ बसून अभिनेत्री रुचिराने दाखवली तिची अदा

घटनास्थळावरील साक्षीदाराला मारहाण केल्याबद्दल अरुण ग्यानदेव पुजारी, राजकुमार ग्यानदेव पुजारी यांना कलम ३२४ प्रमाणे एक वर्ष, तर कलम ३२६ प्रमाणे दोन वर्षांची सक्तमजुरी सुनावण्यात आली. (Four convicts sentenced to life in land dispute)

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: