महिलेसह दाम्पत्यावर खुनी हल्ला करणारे चौघे जेरबंद; भिंगार कॅम्प पोलीसांची कारवाई

प्रतिनिधी DNA टीम
अहमदनगर – भिंगार कॅम्प पोलिसांनी (Bhingar camp police) कारवाईत करत भिंगार परिसरात राहणाऱ्या महिलेसह दाम्पत्यावर खुनी हल्ला करणाऱ्या चार जणांना अटक केली आहे. करण संजय नकवाल ( वय 22 ) , अतुल राजेंद्र नकवाल ( वय 28 ) , सुमित राजेंद्र नकवाल ( वय 30 ) , अमन अजय खरारे ( वय 20 सर्व रा . महात्मा कॉलनी , भिंगार ) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत . चारही आरोपींना 25 मार्च पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. त्यांच्यासह इतरांविरूध्द भिंगार पोलिसांत गुन्हा दाखल असून काही आरोपींना यापूर्वी अटक केली आहे .
10 नाव्हेंबर 2021 रोजी रात्री अमित जगदीश कुडीया ( रा . वाल्मीक सोसायटी , भिंगार ) यांना आरोपी अजय नकवाल व विकी नकवाल हे विनाकारण शिवीगाळ करत होते . त्यावेळी फिर्यादी आशा राजू नकवाल ( वय 55 रा . वाल्मीक सोसायटी ) या आरोपींना म्हणाल्या , ‘ शिवीगाळ का करता ‘ , याचा राग आल्याने आरोपींनी गैरकायद्यांची मंडळी जमवून लाकडी दांडके , दगडे , लोखंडी पाईप , तलवारीने फिर्यादी आशा यांच्यासह अमित कुडीया , सुमित कुडीया , जगदीश कुडीया यांना मारहाण करत खुनाचा प्रयत्न केला होता . याप्रकरणी भिंगार पोलिसात गुन्हा दाखल आहे . या गुन्ह्यातील काही आरोपींना अटक झाली असून त्यांना जामीन देखील मिळाला आहे .
यातील पसार असलेल्या आरोपींना अटक करण्यासाठी सहायक निरीक्षक शिशिकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सतीश शिरसाठ पोलीस हेडकॉन्स्टेबल रामनाथ डोळे ,पोलीस हेडकॉन्स्टेबल अजय नगरे,पोलीस नाईक भानुदास खेडकर,पोलीस नाईक राहुल द्वारके यांचे पथक नियुक्त करण्यात आले होते.उपनिरीक्षक सतीश शिरसाठ यांना गुप्त बातमी मिळाली होती की आरोपी हे वाल्मिक नगर येथील राहत्या घरी आलेली असून छापा टाकल्यास लगेच मिळून येतील अशी गोपनीय माहिती मिळाल्यामुळे पथकातील कर्मचारी यांनीच तत्काळ घरावर छापा टाकून चारही आरोपींना अटक केली आहे .
आरोपींना 25 मार्च पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे पुढील तपास भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सतीश शिरसाठ हे करत आहे.