बेलवंडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्याकडून माजी उपसरपंचना मारहाण

0 531
Former Sub-Panchna beaten up by Nandkumar Dudhal, Inspector of Police, Belwandi Police Station

 

श्रीगोंदा :-   बेलवंडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ (Nandkumar Dudhal) यांच्याकडून निंबवी गावचे माजी उपसरपंच काकासाहेब शिर्के यांना काठीने जबरदस्त मारहाण झाली आहे. काकासाहेब शिर्के हे ढवळगाव येथील कारखाना चौकामध्ये पाहुण्यांना नेण्यासाठी आले असता, तिथे रस्त्याच्या कडेला त्यांची चार चाकी गाडी उभी करून उभे होते. तू इथे का ऊभा थांबला आहे, अशी विचारणा करून त्यांना मारहाण केली आहे. ही घटना गुरुवार दिनांक 26 मे रोजी संध्याकाळी 9 ते 10 च्या दरम्याण झाली आहे. काहीही कारण नसताना पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांनी मारहाण केली आहे आसे म्हणने निंबवी गावचे मा.उपसरपंच काकासाहेब शिर्के यांचे आहे.
निंबवी गावचे दोनशे ते तीनशे ग्रामस्थ ढवळगाव कारखानाच्या चौकात थांबले होते बेलवंडी पोलिस स्टेशन पुढे आंदोलन करण्याच्या पवित्र्यात होते. संध्याकाळचा खूप उशीर झाल्यामुळे उद्योजक मा.पंचायत समिती सदस्य अतुलशेठ लोखंडे यांनी निंबवी ग्रामस्थांची समजूत काढून. याविषयीचा जाब विचारण्यासाठी आपण उद्या जाऊ अशी ग्रामस्थांना सांगितले त्यामुळे सर्व ग्रामस्थ घरी माघारी फिरले. परंतु दिनांक 27 मे रोजी निंबवी ग्रामस्थ,तरुण,महिला मोठ्या संख्येने पोलीस स्टेशन च्या समोर पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्या विरोधात धरणे आंदोलन करणार असल्याची माहिती समजत आहे.

 

Related Posts
1 of 2,326
काकासाहेब शिर्के हे निंबवी गावचे माजी उपसरपंच असून सध्याचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहे त्यांच्याकडून संपूर्ण माहिती घेतली असता त्यांनी सांगितले आहे की निंबवीला येण्यासाठी संध्याकाळची कोणतेही वाहणे उपलब्ध नसतात. ढवळगाव मध्ये नातेवाईक येणार असून त्यांना नेण्यासाठी मी व माझे मित्र आलो असता चौकामध्ये रस्त्याच्या कडेला चार चाकी गाडी लावली होती व आम्ही रस्त्याच्या कडेला उभे होतो, व त्या ठिकाणी नंदकुमार दुधाळ साहेब आले व आम्हांला इथे का उभे राहिले म्हणून उद्धट भाषेमध्ये खवळू लागले, नातेवाईक येणार आहेत ते आले की आम्ही लगेच जाणार आहे अशे त्यांना बोललो असता त्यांनी लगेच काठीने अमानुषपणे हानमार करण्यास सुरुवात केली, व मला उलटे बोलतो अशे म्हणत काठीने मारहाण केली,अशी प्रतिक्रिया काकासाहेब शिर्के यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.

 

या हानमारी मुळे ढवळगाव पंचक्रोशीतील गावामधील नागरिकांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
ढवळगाव हे निंबवी,कोंडेगव्हाण,आरणगाव,माठ,राजापुर,येवती, या गावांना व वाड्या वस्त्यांना जोडणारे गाव आहे,व या गावांना जाण्यासाठी संध्याकाळची कोणतीही वाहने उपलब्ध नसतात व घरी जाण्यासाठी कुणी ना कुणी नातेवाईक ढवळगाव चौकामध्ये थांबत असतात पंरतु कसल्याही प्रकारची खात्री न करता माजी उपसरपंच काकासाहेब शिर्के यांना हानमार झाल्यामुळे या अनेक गावातील ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
बेलवंडी पोलीस स्टेशन चोर सोडून संन्याशाला फाशी देते काय ?
अनेक दिवसांपासून बेलवंडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये चोरी,दरोडे,अवैध धंदे, यांचा चांगलाच पेव सुटला असुन त्यावर पोलिसांचा कसलाच वचक राहिला नाही. पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर एका रात्रीत अनेक चोऱ्या होतात, दिवसाढवळ्या रस्त्यावर लुटीचे प्रकार होत आहे,आरोपी पोलिसांना सापडतही नाही, त्यामुळे संतप्त नागरिकांकडून बेलवंडी पोलीस स्टेशन विषयी चोर सोडून संन्याशाला फाशी देते काय ? असा प्रश्न उपस्थित होत असून, बेलवंडी येथील पोलिसांविषयी नागरिकांमध्ये एक वेगळीच प्रतिमा तयार होत आहे.?
राहूरी मध्ये पण असेच वादग्रस्त 
यापूर्वी कार्यरत असलेल्या राहुरी पोलीस ठाण्यात असेच एका सामाजिक कार्यकर्ते याना मारहाण केल्याप्रकरणी राहूरीत मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला होता तसाच प्रकार श्रीगोंदयात उपसरपंच यांना मारहाण केल्यामुळे घडला आहे त्यामुळे पोलीस अधीक्षक यांनी तात्काळ लक्ष घालावे बहितर आराजक्ता माजल्याशिवाय राहणार नाही असे नागरिकांचे मत आहे.
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: