माजी खासदार दिलीप गांधी यांचे निधन

0 12

अहमदनगर – माजी केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते दिलीप गांधी यांचे निधन बुधवारी पहाटे झाला. ते 70 वर्षांचे होते. कोरोनाची लागण झाल्याने दिलीप गांधी यांची प्रकृती अत्यवस्थ होती. दिल्ली येथे त्यांच्यावर खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते.

जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या गाडीचा अपघात

मागच्या काही दिवसांनी त्यांची प्रकृती बरी नसल्याने ते दिल्ली मधील एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत होते.
प्रकृती बरी नसल्याने त्यांची कोविड-१९ ची टेस्ट करण्यात आली होती आणि त्यांची कविड टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. मंगळवारीच त्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती.

श्रीगोंदा तहसील कार्यालयात अधिकाऱ्यांच्या खुर्चीवर वाळूतस्कर

Related Posts
1 of 1,301

मंगळवारी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना श्वसनाचा त्रास जाणवू लागला. काल दुपारपासूनच त्यांना दिल्लीतील खाजगी रुग्णालयामध्ये व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. बुधवारी पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलं आणि एक मुलगी असा परिवार आहे.

मंत्रिमंडळात होणार फेरफार ? नाना पटोले यांनी दिली ही प्रतिक्रिया….. 

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: