
श्रीगोंदा –काँग्रेस शहराध्यक्ष नगरपरिषद श्रीगोंदा गटनेते मनोहर पोटे यांनी संतोष इथापे यांना जीवे मारण्याची धमकी दिली असून अहमदनगर येथे कोतवाली पोलीस स्टेशन मध्ये दि .७ रोजी तक्रार दाखल केली असून कलम 507 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संतोष इथापे हे आक्रमक ,प्रखड, स्पष्टवक्ते सामाजिक भान असलेले नेते असून सडेतोड भूमिका मांडण्यात निष्णात आहेत.श्रीगोंदा नगरपरिषद मध्ये अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणांवर त्यांनी आवाज उठवला असून अनेक आंदोलने केली आहेत. पालीकेतील गैरकारभार उघड केले आहेत .गैरकारभार थांबवण्यासाठी लढा दिला आहे . शहराला चांगल्या सुविधा मिळाव्यात म्हणून पालीकेच्या कारभारावर लक्ष देत आहेत .त्यातच सतीश बोरुडे यांवर हल्ला झाला त्यांप्रकरणी संतोष इथापे यांनी पहिल्यापासून भूमिका घेतली. श्रीगोंदा शहर बंद ठेवण्यात व व्यापाऱ्यांशी चर्चा करणे, व आक्रोश मोर्चा मध्ये सडेतोड भूमिका घेऊन त्यांनी अन्यायाविरुद्ध आवाज उठवला होता.

नगराध्यक्ष पोटे यांनी हल्ला घडवला असून पोलीस निरीक्षक यांनी खोटा गुन्हा दाखल केला होता या विषयी इथापे यांनी आक्रमक भूमिका घेत निषेध नोंदवला होता.त्यांनतर इथापे हे सर्व घडामोडीत सक्रिय होते. दिनांक 7 एप्रिल 2022 रोजी याच प्रकरणाच्या चौकशीचे जवाब नोंदवण्यासाठी टिळक भोस सतीश बोरुडे, समित बोरुडे, यांसमवेत संतोष इथापे पाटील त्यांच्या सोबत पोलीस अधीक्षक कार्यालय अहमदनगर येथे अजित पाटील उप विभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात उपस्थित होते. त्यानंतर आनंद ऋषी नेत्रालयाच्या इमारतीतील भोजनालय येथे चौघे जेवण करत असताना मनोहर पोटे याने संतोष इथापे यांना फोन वरून दुपारी 2 वाजून 38 मिनिटांनी माझे 90(नायंटी) चे बिल तुम्ही कधी दिले आहे का हो , मग आक्रोश मोर्चा मध्ये कसकाय 90(नायंटी ) व कोर्टर चा उल्लेख तुम्ही केला ,का केला आहे, तुम्ही माझ्या खासगी जीवणाबाबद्दल बोलला राजकारणात जे मिळवायचे ते सर्व मी मिळवले आहे.
आता मला राजकारनाचे फार काही देणे घेणे नाही.मला जीवन जगण्यासाठी मी भरपूर कमवून ठेवले असून इथून पुढं माझ्या नादी लागणार्यांना सुट्टी देणार नाही मग तुम्ही असो ,टीळक भोस असो नहीतर कुणी असो असे म्हणून धमकाऊन जीवे मारण्याची धमकी दिली.तयानंतर इथापे यांनी तातडीने कोतवाली पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदवला . तसेच पोलीस अधीक्षक-जिल्हाधिकारी यांची समक्ष भेट घेऊन सर्व घटनाक्रम सांगीतला . वारंवार धमकावने , हल्ले घडवणाऱ्या मनोहर पोटे यांची दहशत मोडीत काढण्यासाठी त्यांचे पिस्तुल जप्त करून त्यांचा शस्त्र परवाना रद्द करावा तसेच पोटे यांवर या प्रकरणी व सतीष बोरूडे प्रकरणी तातडीने कारवाई करण्याची मागणी केली.तसेच पोटे यांनी सतीश बोरुडे यांवर मारेकरी घालून हल्ला केला तसा माझ्यावर सुद्धा होऊ शकतो त्यासाठी मला पोलीस संरक्षण द्या अशी मागणी केली असून, योग्य कारवाई केली गेली नाही तर लवकरच जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक कार्यालय अहमदनगर येथे आंदोलन ठेवण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला आहे.

पोटे यांची मग्रुरी खपवून घेतली जाणार नाही:- इथापे
पोटे यांच्या नायंटी क्वाटर बाटली असा मी कसलाही उल्लेख मी आक्रोश मोर्चात केला नाही. किंवा कोणाला करायला लावला नाही माझ्या भाषणात तसा उल्लेख नाही असे सांगूनही तरी तुम्हीच नांयटी क्वाटर असा उल्लेख केला , खालून करायला लावला असा आरोप करून मला धमकावून सुट्टी देणार नाही असा फोन केला ही मनोहर पोटे यांची मग्रुरी खपून घेतली जाणार नाही .
पोलीस सौरक्षण मिळावे – टिळक भोस
मनोहर पोटे यांनी इथापे यांना फोन केला त्यावेळी त्यांनी स्पीकर मोठा केला आम्ही शेजारीच जेवण करत असलेने मी एकत होतो फोनवर मला सुद्धा जीवे मारण्याची धमकी दिली आहे.यापूर्वी देखील त्यांनी मला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या आहेत. व सतीश बोरुडे यांची सुपारी दिली आहे.त्यांच्या पासून माझ्या जीवितास धोका आहे.त्यासाठी मला शस्र परवाना व पोलीस संरक्षण मिळावे अशी मागणी करणार आहे.असेही टिळक भोस यांनी पत्रकात म्हटले आहे.