माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक मनोहर पोटेंनी सतीश बोरुडेंच्या खुनाची सुपारी दिली..! टिळक भोस

0 423
Young man beaten to death on suspicion of mobile theft; Death of a young man

प्रतिनिधी – DNA मराठी टीम

श्रीगोंदा :-  शहरासह तालुक्यातील सामाजिक सलोख्याचे वातावरण ढवळून निघाले आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांवरील हल्ल्यांच्या निषेधार्थ काल दिनांक 24 मार्च 2022 रोजी शेख महंमद बाबा दर्गामध्ये निषेध सभेसह गाव बंद करत दोषींवर कारवाईसाठी आंदोलन करण्याबाबत चर्चा झाली.

यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष टिळक भोस यांनी सतीश बोरुडे यांच्यावर झालेला हल्ला हा खुनी हल्ला असल्याचे नमूद केले. हस्तकांच्या माध्यमांतून माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे यांनी बोरुडे यांचा खून करण्याची सुपारी दिल्याचा आरोप जाहीर सभेत केला. हे खोटे असल्यास मनोहर पोटे यांनी ते सिद्ध करून दाखवावे.! असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. सतीशला वारंवार खुनाची धमकी येत होती. घटनेच्या दिवशी संघटनेचे पदाधिकारी व घरातील सदस्य बाहेर गावी गेल्याचे पाहून, सतीशचा खून करण्याचा प्रयत्न होता. असे टिळक यांनी सांगितले.

पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, आपण कधी दुधात भेसळ केली नाही. रात्रीची वाळू काढलेली नाही किंवा रस्त्यात पैसे खाल्ले नाहीत. हे उद्योग विघ्नसंतोषी लोकांचे आहेत.आम्ही महापुरुषांच्या विचारधारेचे अवलंब करणारे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी भोस म्हणाले की, पोलिसांनी सतीशवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे तात्काळ दाखल केले आहेत. पोलिसांना कारवाईच करायचीच आहे ना..? तर त्यांना जाहीर आव्हान आहे की, त्यांनी शेख महंमद बाबा दर्गाच्या मागे चालू असलेला वेश्या व्यवसाय तात्काळ थांबवावा.. तालुक्यातील गोरगरीबांवरील अन्याय थांबवावा.. पोलीस कायदा आणि सुव्यवस्था सांगतात ना.. तर हा पोलिसांचा फायदा आणि सुव्यवस्था आहे. दुसरं काही नाही..! तालुक्यात चाललेले अवैध धंदे कुठे चालू आहेत..? कोण कोणते पोलीस हप्ते घेतात.? संभाजी ब्रिगेड लवकरच दाखवून देईल. जुगार, वाळू, मटक्याचे कलेक्शन कोण कोणता पोलीस करतो.? याबाबतची माहिती लागलीच जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

याप्रकरणी पोलीस प्रशासन ज्यादिवशी सतीशला अटक करतील.! त्याच्या पंधरा दिवसाच्या आत पोलिस निरिक्षक रामराव ढिकले पोलीस स्टेशनमध्ये नसतील..! ज्या पोलीस कस्टडीत सतीश बोरुडे असेल.. त्याच कस्टडीत रामराव ढिकले असतील..! असे जाहीर आव्हान त्यांनी या वेळेस उपस्थितांसमोर केले.

Related Posts
1 of 2,357

त्याचबरोबर खोटे गुन्हे दाखल करणारे डीवायएसपी अण्णासाहेब जाधव यांचाही यावेळी निषेध करण्यात आला. अण्णासाहेब जाधव परिस्थितीचे गुणगान गाऊन..लोकांची सहानभूती मिळवतात.. मात्र, त्यांनी गैरमार्गाने मोठी संपत्ती गोळा केल्याचा आरोप टिळक यांनी यावेळी केला.

यावेळी उपस्थित असलेल्या तरुणांना भोस यांनी आवाहन केले की, श्रीगोंदा पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात पोलीस कोठून आणि कोणाकोणाचे हप्ते गोळा करतात याची माहिती ब्रिगेडला द्या. पोलिसांनी गोरगरिबांना छळायच.. 2 नंबर वाल्यांचा सन्मान करायचा.. आणि लाचखोर भ्रष्ट पुढाऱ्यांच्या हाताने पोलीस ठाण्याचा कारभार चालवायचा. आता हे थांबले पाहिजे असे सांगितले.

सतीश बोरुडे हल्ला प्रकरणानंतर उद्या शहर बंदची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच, सोमवारी सूत्रधारांवर कारवाई करा.. ढिकले आणि अण्णासाहेब जाधव यांच्यावर कारवाई करा.. यासाठी भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.

नमूद बैठकीमध्ये अनेकांनी आपले विचार व्यक्त केले. यावेळी ऍड संभाजी बोरुडे, ऍड बोरुडे ताई, अत्तर भाई शेख, एम डी शिंदे, संतोष इथापे, विकास बोरुडे, दिलीप लबडे, सुनील ढवळे, अरविंद कापसे, अमर घोडके, दत्ताजी जगताप, बाप्पू माने, नंदू ससाने, जीवा घोडके, वसीम ताडे, नाना शिंदे, सुरेश सुपेकर, स्वप्निल खेत्रे, सिटीझन चे संपादक अमीन शेख सह बहुसंख्य तरुण वर्ग व ग्रामस्थ उपस्थित होते. शेवटी ऍड संभाजीराव बोरुडे यांनी मार्गदर्शन केले व पुढील कार्यक्रमाची रूपरेषा नमूद केली.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: