पिंपरखेड सेवा संस्थेत माजी उपसभापती अंकुशराव ढवळे यांच्या मंडळाचा दणदणीत विजय, सरपंच पराभूत

0 172

 

जामखेड – पिंपरखेड सेवा संस्थेच्या निवडणुकीत पंचायत समितीचे माजी उपसभापती अंकुशराव ढवळे यांच्या
जनसेवा शेतकरी विकास पॅनेलने सर्वच्या सर्व १३ जागा जिंकून दणदणीत विजय मिळविला. ग्रामपंचायत सरपंच बापूराव ढवळे यांचा व पॅनेलचा दारूण पराभव झाला.

पिंपरखेड सेवा संस्थेची निवडणूक शुक्रवार रोजी झाली या निवडणुकीत ९० टक्के मतदान झाले. चार वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. पंचायत समितीचे माजी उपसभापती अंकुशराव ढवळे यांच्या मंडळाने सुरवातीपासून आघाडी घेऊन ती कायमस्वरूपी टिकवून दणदणीत विजय मिळविला. पिंपरखेड ग्रामपंचायत सरपंच बापूराव ढवळे हे स्वताहा पराभूत झाले तसेच सर्व पॅनेलचा दारूण पराभव झाला.

Related Posts
1 of 2,139

विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे
१) पांडुरंग विठ्ठल ढवळे ४४५
२) भगवान आप्पा ओमासे ४४३
३)आनंदराव सुभेदार भापकर ४३४
४) दगडू आंबादास कदम ४३१
५) शिवाजी मथुरदास ढवळे ४३१
६) मोहन रंगनाथ शिंदे ४१५
७) रहीमान महेबूब शेख ४१४
८) दगडू आंबादास कदम ४३४
९)दगडाबाई नवनाथ ढवळे ४७१
१०) गजराबाई सुदाम लबडे ४४६
११) करीश्मा रवींद्र रोही ४५७
१२) संभाजी ज्ञानदेव कारंडे ४७५
१३) संभाजी तानाजी सातपुते ४६०

निवडणूक निर्णय अधिकारी देवीदास घोडेचोर व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी निलेश मुंडे यांनी काम पाहिले.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: