माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम याला अटक , जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

0 584

अहमदनगर – अहमदनगर शहरा (Ahmednagar city) चे माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम (Former Deputy Mayor Shripad Chhindam) आणि त्याच्या भाऊ श्रीकांत छिंदम यांच्यावर मागच्या काही दिवसापूर्वी ॲट्रॉसिटी (Atrocity) चा गुन्हा दाखल झाला होता. त्या दिवसापासून हे दोघे फरार होते मात्र आज तोफखाना पोलिसांनी कारवाई करत दोघांना अटक केली आहे.(Former Deputy Mayor Shripad Chhindam arrested, know the whole case)

प्रकरण काय

शहरातील दिल्ली गेट परिसरात टपरी चालक भागीरथ भानुदास बोडखे याला जातीवाचक शिवीगाळ करून तसेच त्याच्या ज्युस सेंटर मधील साहित्य फेकून देऊन त्याच्या गल्यातील 30 हजार रुपये हिसकावून घेतल्याच्या आरोपावरून माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम आणि त्यांच्यासह इतर 30 ते 40 जणांविरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात जबरी चोरी आणि ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात फरार असलेला श्रीपाद छिंदम याचा शोध पोलीस घेत असताना काल रात्री ते शहरांमध्ये दाखल झाला असल्याची माहिती तोफखाना पोलिसांना मिळाली. त्यानुसार तोफखाना पोलिसांनी कारवाई करत दोघांना अटक केली आहे.

शुल्लक कारणावरून युवकाची धारदार शस्त्राने वार करुन हत्या?

Related Posts
1 of 1,603

 तोफखाना ठाण्याच्या पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी (Police Inspector Jyoti Gadkari) यांनी आम्ही या दोघांना अटक केली असून त्यांच्या उर्वरित साथीदारांचा शोध घेत असून यामध्ये अजून दोन जणांना अटक पूर्व जामीन मिळाल्यामुळे त्यांची सुद्धा चौकशी सुरू केल्याची माहिती दिली आहे. (Former Deputy Mayor Shripad Chhindam arrested, know the whole case)

हे पण पहा –Ahmednagar | निळवंडे धरणही ओव्हरफ्लो

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: