विश्वचषक विजेत्या संघाचे सदस्य माजी क्रिकेटपटू यशपाल शर्मा यांचा निधन

0

नवी मुंबई –  1983 क्रिकेट विश्वचषकाच्या संघात असणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू यशपाल शर्मा  (Yashpal Sharma) यांचा आज निधन झाला आहे. हृदयविकाराच्या झटक्याने यशपाल यांचं निधन झालं आहे.

यशपाल शर्मा कपिल देव (Kapil Dev) यांच्या नेतृत्वात 1983 च्या विश्वचषक विजेत्या संघाचे सदस्य होते. त्यांनी 37 एकदिवसीय आणि 42 कसोटी सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. ते 1979-83 दरम्यान भारताच्या मध्यम फळीचा एक महत्त्वाचा हिस्सा होता. त्यांनी काही वर्षे राष्ट्रीय निवडकर्ता म्हणूनही काम केले आणि 2008 मध्ये पुन्हा पॅनेलवर त्यांची नेमणूक झाली होती.

शिवसेनेला धक्का, माजी राज्यमंत्री करणार काँग्रेसमध्ये प्रवेश

Related Posts
1 of 42

यशपाल शर्मा 66 वर्षांचे होते. यशपाल शर्मा 1983 विश्वचषकात भारताकडून सर्वाधिक धावा करणारे दुसरे खेळाडू होते. त्यांनी 37 कसोटी सामन्यात 33.45 च्या सरासरीने 1606 तर 42 एकदिवसीय सामन्यात 28.48 च्या सरासरीने 883 केले होते.

देशात ११८ दिवसानंतर सर्वात कमी बाधितांची नोंद, आज इतक्या रुग्णांची नोंद

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: