वनमंत्री संजय राठोड यांनी दिला आपल्या पदाचा राजीनामा …

0 27

नवी मुंबई – २२ वर्षीय पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले राज्याचे वनमंत्री  संजय राठोड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे . संजय राठोड यांनी मातोश्रीवर आपला राजीनामा पाठवला आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हा राजीनामा स्वीकारणार की नाकारणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून या ज्येष्ठ मंत्र्याच्या नावाची चर्चा

 मूळची परळीची असलेली २२ वर्षाची पुजा चव्हाण पुण्यात शिकण्यासाठी आली होती. तिच्या भावासोबत ती पुण्यातल्या हडपसर भागात रहात होती. मागच्या काही दिवसापूर्वी  मध्यरात्री १ च्या सुमारास  तिनं सोसायटीच्या पहिल्या मजल्यावरुन उडी मारली. हॉस्पिटलमध्ये नेत असतानाच तिचा जीव गेला.  त्यानंतर दुसऱ्या दिवशी तिच्या आत्महत्येचा आणि विदर्भातल्या एका मंत्र्याचा संबंध असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली. प्रेमसंबंधातूनच पुजानं स्वत:ला संपवल्याचं बोललं जाऊ लागलं. पण पुजाच्या आत्महत्येनंतर कुठलीही चिठ्ठी किंवा इतर मेसेज असलेलं काही सापडलेलं नाही.

पडळकरांचं वय किती पवारसाहेबांचा अनुभव किती – जयंत पाटील

Related Posts
1 of 1,323

संयमी पण कडक शिस्तीसाठी ओळखले जाणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याप्रकरणाची गंभीर दखल घेतली. उद्धव ठाकरेंनी मंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेऊन, कडक कारवाई केली. उद्धव ठाकरे यांनी कारवाई केलेले हे पहिलेच मंत्री ठरले आहेत. महत्त्वाचं म्हणजे संजय राठोड हे महाविकास आघाडीचे मंत्री असले तरी ते शिवसेनेचे नेते आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी स्वत:च्या मंत्र्यावर कारवाई करुन कडक इशारा दिला आहे.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण – संजय राठोड राजीनामा देण्याच्या तयारीत ?

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: