जिल्ह्यात भर बाजारपेठेतील मॉल मध्ये जबरी चोरी; १ लाख रोख रकमेसह किराणा सामानाची चोरी

0 226
Village spectacle: Thieves break peace; Lampas worth thousands of rupees

प्रतिनिधी DNA मराठी टीम 

श्रीगोंदा : श्रीगोंदा तालुक्यातील नगर-दौंड रोडवर काष्टी येथील अजनुज चौकातील साईसेवा सुपर बाजार (Saiseva Super Bazaar)हे किराणा दुकान फोडून चोरट्यांनी दुकानातील एक लाख रुपये रोख तसेच तेल डबे, ड्रायफुड असा ९० हजार रुपयेचा किराणा माल चोरुन नेला. या प्रकरणी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात जयश्री ज्ञानदेव पाचपुते यांनी फिर्याद  दाखल केली असुन पुढील तपास पोलिस निरिक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु झाला आहे.

सविस्तर माहिती अशी कि तालुक्यातील काष्टी येथे नगर-दौंड रोडवर साईसेवा संस्थेचे अध्यक्ष ज्ञानदेव पाचपुते यांचे साईसेवा सुपर बाजार नावाने किराणा माॕल आहे. दुकानात त्यांचा  दि.११ रोजी  रोहित पाचपुते यांनी रात्री आठच्या सुमारास दुकान बंद करुण गेल्यानंतर सकाळी दहा वाजता दुकान उघडल्यानंतर सर्व किराणा माल अस्तवेस्त पडलेला पाहून सर्वत्र पाहाणी केली असता येथे चोरी झाली. मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी किराणा माॕलच्या मागील बाजुने पत्रा कापून आत मध्ये प्रवेश करुण माॕल मध्ये विक्रीसाठी ठेवलेले तेलाचे पंधरा डबे तसेच बदाम व काजुचे कट्टे, बिस्कीत बाॕक्स सह जीवनाआवश्यक वस्तू मिळून सुमारे ९० हजार रुपयेचा किराणा माल तसेच माॕल मधील  गल्ल्यातून व्यापाऱ्यांना देण्यासाठी ठेवलेली एक लाख रुपयेची रोख रक्कम मिळून सुमारे १ लाख ९० हजार रुपयेची चोरी करुण चोरटे पसार झाले आहे. या प्रकरणी पोलिसांना माहिती मिळताच साहाय्यक पोलिस निरीक्षक महेश जानकर, पो.काॕ.देवकाते, टाके यांनी दुपारी घटनास्थळी भेट देवून पहाणी करुण घटनेचा पंचनामा केला आहे. जयश्री पाचपुते यांनी चोरीची फिर्याद दाखल केली असुन पुढील तपास श्रीगोंदा पोलिस करित आहे.
सी.सी.टी.व्ही. हार्डडिस्क नेली काढून…
जवळपास सर्व व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानात सुरक्षेसाठी सी.सी.टी.व्ही. बसवलेले आहेत. पाचपुते यांच्या किराणा दुकानात असलेल्या सी सी टी व्ही मध्ये चोरटे कैद झाले मात्र आता चोरटे देखील टेक्नोसेव्ही झाले असल्याने त्यांनी चोरी करुण जाताना दुकानातील कॕमेऱ्यासह माहिता डाटा असणारे  हार्डडिक्स देखील काढून नेले. या मुळे पोलिसांच्या पुढे तपासाचे आव्हान वाढले आहे.
Related Posts
1 of 2,420
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: