अन्न व भेसळ प्रशासनाला पोलीस वरचढ?

0 248
Former Sub-Panchna beaten up by Nandkumar Dudhal, Inspector of Police, Belwandi Police Station

 

अहमदनगर – जिल्ह्यामध्ये बेकायदेशीर गुटख्याची दररोज लाखो रुपयांची विक्री होत असताना अन्न व भेसळ खाते याकडे दुर्लक्ष करत आहे. या गुटख्याच्या विरोधात कारवाई करण्याची जबाबदारी अन्न भेसळ खात्याची असताना या खात्याऐवजी अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा पोलीस अधिक सक्रिय असल्याचे दिसत आहे.पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांच्या आशीर्वादाने मोठ्या प्रमाणावर गुटखा विक्री होत आहे. गुटखा विक्री बाबतचे सर्व निर्णय श्रीगोंदा पोलीस घेत असल्याची चर्चा गुटखा व्यवसासिकांमध्ये आहे. यामुळे श्रीगोंदा पोलीस वरचढ होत असून अन्न व भेसळचे अधिकारी करतात तरी काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.

अहवाल तयार करणारेच दोषी ?

श्रीगोंदा पोलीस ठाण्यांतील पोलीस कर्मचारी गुटखा टोळीचा खरा सूत्रधार असल्याचे निदर्शनास आल्यावर सखोल माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता या साखळीत वरपासून अगदी खालपर्यंत सर्वांचेच हात बरबटलेले असल्याने दोषी असणाऱ्या कर्मचारी यांचा अहवाल तयार करणारे अधिकारी पण दोषी असल्याने आता दोषींचा अहवाल नेमका कोण तयार करणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

 

 

Related Posts
1 of 2,357

धास्तीने गुटखा तुटवडा ?

रोजच वर्तमान पत्रातून बातम्या झळकत असल्यामुळे गुटखा विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणात धास्ती घेतल्याने पावलोपावली मिळणारा गुटखा आता मिळत मोठ्या प्रमाणात विकला जाणार गुटखा धास्तीने मिळणे मुस्किल झाले आहे. त्यामुळे गुटखा विक्रेत्यांनी धास्ती घेतल्याचे बोलले जात आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: