बहुचर्चित जवळा सोसायटी निवडणूकीत सर्वपक्षीय शेतकरी विकास आघाडीचा झेंडा

0 161
Flag of the All-Party Farmers Development Front in the much talked about Near Society elections
प्रतिनिधी अशोक निमोणकर
जामखेड –  जामखेड तालुक्यातील बहुचर्चित जवळा सोसायटीच्या निवडणुकीत सर्वपक्षीय प्रणित शेतकरी विकास आघाडी मंडळाने सर्वच्या सर्व तेरा जागा दोनशेच्या फरकाने जिंकून प्रतिस्पर्धी मंडळावर दणदणीत विजय मिळविला. या विजयामुळे जवळा गटातील राजकीय समीकरण बदलले आहे.
जवळा सोसायटीसाठी रविवारी सकाळी ८ ते ४ या कालावधीत मतदान झाले. १६६७ मतदारांपैकी १५०३ जणांनी मतदान केले. ९० टक्के मतदान झाले यानंतर लगेचच मतमोजणी झाली. शेतकरी विकास आघाडीच्या मंडळाने पहिल्या फेरी पासून आघाडी घेऊन शेवटपर्यंत टिकवली. सर्वपक्षीय सांघिक नेत्यांच्या प्रयत्नामुळे हे मंडळ विजयी झाले.
Related Posts
1 of 2,326
विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे
कर्जदार मतदार संघातून  1) नवनाथ पोपट बारस्कर  799 2) राजेंद्र रामचंद्र हजारे – 817  3)अविनाश काकासाहेब लेकुरवाळे – 767 4)काशिनाथ गहिनीनाथ मते – 799 5)चंद्रहार किसन पागिरे – 803  6)अरूण नामदेव रोडे – 804 7कैलास महादेव वाळुंजकर 788, 8) शहाजी संभाजी पाटील (वाळुंजकर) 790  9)आयोध्या रामलिंग हजारे – 826  10)सायरा सत्तार शेख- 828, 11) शिवाजी तुकाराम कोल्हे – 846 12)मच्छिंद्र मारूती सुळ – 833 13) रूपचंद तुकाराम अव्हाड – 846शेतकरी विकास आघाडीचे उमेदवार विजयी होताच विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी गुलाल उधळून व फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. यावेळी ज्योती क्रांती मल्टिस्टेट संस्थेचे अध्यक्ष आजिनाथ हजारे म्हणाले, सोसायटीत मिळालेला विजय लोकनेते स्वर्गीय श्रीरंगराव कोल्हे व लोकनेते स्वर्गीय प्रदीप आबा पाटील यांना अर्पण करतो. सभासदांनी आमच्यावर विश्वास दाखवला त्यामुळे संस्थेचा कारभार सभासदभिमुख करणार असून सर्व नेत्यांनी सांघीक प्रयत्न केल्यामुळे यश मिळाले आहे.
यावेळी शेतकरी विकास आघाडीच्या पॅनलचे डॉ. महादेव पवार, दशरथ हजारे, प्रशांत पाटील, राजेंद्र राऊत, डॉ. दिपक वाळुंजकर, अभय नाळे, बाबा महानवर यांनी भाषणे केली यावेळी आदीनाथ कारखान्याचे संचालक राजेंद्र पवार, माजी उपसभापती दिपक पाटील, दत्तात्रय कोल्हे, भिमराव हजारे, सत्तार शेख, सुखदेव मते, शहाजी पाटील उपस्थित होते.
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: