तालुक्यासाठी पाच वर्षांचे व्हिजन ठरवणार – संचालक अमोल राळेभात

0 11

जामखेड –  जिल्हा सहकारी बँकेच्या माध्यमा तून तालुक्यातील शेतकऱ्यांची अर्थीक प्रगती होण्यासाठी व्हिजन तयार करण्यात येत असून त्यामुळे शेतकरी समृद्ध बनतील व सेवा संस्था सशक्त होतील यासाठी आपले प्राधान्य असणार असल्याची माहिती नवनिर्वाचित संचालक अमोल राळेभात यांनी दिली.

राज्यात लॉकडाउन हा शेवटचा पर्याय  – आरोग्यमंत्री राजेश टोपे 

खासदार डॉ. सुजय विखे पा. यांच्या कार्यालयात नवनिर्वाचित जिल्हा बॅंकेचे संचालक अमोल राळेभात यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार कार्यालयाच्या वतीने त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष अजय काशिद , भाजपा युवा मोर्च्याचे तालुकाध्यक्ष शरद कार्ले , साकत सेवा संस्थेचे अध्यक्ष प्रा. अरूण वराट , अशोक निमोणकर, सचिव नितीन सपकाळ, दीपक नेटके, आबासाहेब कोंढाणे, गोरख वराट, गणेश पोकळे, प्रदिप लहाने, कृष्णा पुलावळे आदी उपस्थित होते.

जिल्ह्यमधील एकाच घरातील दहा जणांना कोरोनाची लागण ….

Related Posts
1 of 1,301

यावेळी बोलताना संचालक अमोल राळेभात म्हणाले, माझे वडील जगन्नाथ राळेभात यांनी १५ वर्षे संचालक पद उपभोगताना शेतकऱ्यांची सेवा केली कर्जप्रकरणात कोणालाही अडवले नाही त्याच धर्तीवर आपण काम करू शेतकऱ्यांची अर्थीक उन्नती होवो यासाठी आपण प्राधान्याने प्रयत्न करणार असून पाच वर्षांचे व्हिजन तयार करीत आहोत व लवकरच त्याची अंमलबजावणी करू असे राळेभात म्हणाले.

तीन दिवस डांबून ठेवून एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार,गुन्हा दाखल 

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: