आरोपी कडून पाच तोळे सोन्याचे दागिने हस्तगत, श्रीगोंदा पोलीसांची कारवाई

0 187

श्रीगोंदा –   श्रीगोंदा पोलिसांनी (Shrigonda police) कारवाई करत घरफोडी करणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. या कारवाई श्रीगोंदा पोलिसांनी आरोपीकडून २ लाख २५ हजार रुपये किंमतीचे पाच तोळे सोन्याचे दागीने (gold jewelery) हस्तगत केले आहे. या कारवाईत शुभम उर्फ मुन्ना तात्या घोडेकर (वय 25 वर्षे रा. श्रीगोंदा कारखाना ता. श्रीगोंदा) या आरोपीला अटक केली आहे. (Five weights of gold jewelery seized from accused, Shrigonda police action)

मिळालेल्या माहितीनुसार  मिनाबाई भ्र विष्णु बांगर रा. श्रीगोंदा कारखाना यांनी दि. 16 ऑक्टोबर रोजी फिर्याद दिली होती. रात्रीचे वेळी कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांचे घरातील कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने चोरुन नेले होते.यावरुन श्रीगोंदा पोलीस स्टेशन गुन्हा रजि नं 707/2021 भा.द.वि 380 प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्ह्याचे तपासा दरम्यान रामराव ढिकले पोलीस निरीक्षक श्रीगोंदा पोलीस स्टेशन यांनागुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सदर घरफोडी हा ईसम नामे शुभम उर्फ मुन्ना तात्या घोडेकर (वय 25 वर्षे रा. श्रीगोंदा कारखाना ता. श्रीगोंदा )याने केली आहे.

गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांना सदर संशयित ईसमास ताब्यात घेवून चौकशी करण्यास सांगितले होते. त्यांनी वरील इसमास ताब्यात घेतले व त्याचेकडे कसुन चौकशी केली असता त्याने घरफोडी केली असले बाबत ची कबुली केले आहे. आरोपीकडुन गुन्ह्यात चोरलेले सोन्याचे मणी, कानातील झुबे, व गळ्यातील गंठण असे 50 ग्रॅम वजानाचे दोन लाख पंचविस हजार रुपये  किंमतीचे सोन्याचे दागिने दागिने हस्तगत केले आहे.   आरोपी पोलीस कस्टडी मध्ये आसुन त्यांचेकडुन आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस नाईक गोकुळ इंगवले हे करीत आहेत.

तर विमा कंपन्यांवर गुन्हे दाखल करायला मागे पुढे पाहणार नाही – अजित पवार

Related Posts
1 of 1,481

सदरची कारवाई पोलीस अधिक्षक मनोज पाटील , अप्पर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव साहेब यांचे मार्गदर्शनाखाली श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले , सपोनि दिलीप तेजनकर, पोसई अमित माळी, सफो अंकुश ढवळे, पोना गोकुळ इंगवले, पोकों प्रकाश मांडगे, पोकॉ किरण बोराडे, पोकों दादा टाके, पोकॉ अमोल कोतकर यांनी केली आहे.(Five weights of gold jewelery seized from accused, Shrigonda police action)

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: