विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे साडेपाच एकर ऊस जळून खाक , शेतकऱ्यांकडून आंदोलनाचा इशारा

0 242

खोकर –  शिवारात गेल्या पाच दिवसांपूर्वी गट नं. ८० मधील सुभाष लक्ष्मण धाकतोडे यांचा अडीच एकर व सोहेल गफार मिर्झा यांचा तीन एकर असा साडेपाच एकर तोडणीला आलेला ऊस (sugarcane) विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे(Short circuit)  जळाल्याची दुर्घटना ताजी असताना काल याच परिसरातील खोकर टाकळीभान रोडलगत असलेल्या गट नं. १६ मधील राजेंद्र सोपान पटारे यांचा दोन एकर तोडणीला आलेला विजेच्या शार्टसर्किटमुळे आग लागून आगीच्या भक्ष्यस्थानी पडला आहे.(Five and a half acres of sugarcane burnt due to short circuit of electricity, warning of agitation from farmers)

श्रीरामपूर तालुक्यातील खोकर शिवारात महावितरणच्या दुर्लक्षितपणामुळे तोडणीला आलेले उसाचे जळीत होण्याचे प्रकार सुरू झाल्याने शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण निर्माण होताना दिसत आहे. या परिसरात एकाच आठवड्यात तीन शेतकऱ्यांचा मिळून साडेसात एकर ऊस विजेच्या शॉर्टसर्किटमुळे जळाला आहे.

राज्यातील दंगलीची चौकशी करणार – गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील

Related Posts
1 of 24

 वीज वाहक तारांमध्ये घर्षण होवून ठिणग्या पडून आग लागत असल्याने महावितरणने या वीजवाहक तारा उंच कराव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकऱ्यांकडून दिला जात आहे. यावेळी पोपटराव जाधव, पोलिस पाटील डॉ. अनिकेत चव्हाण, माजी सरपंच लक्ष्मण चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य ताजखाँ पठाण आदी उपस्थित होते.(Five and a half acres of sugarcane burnt due to short circuit of electricity, warning of agitation from farmers)

हे पण पहा- दंगल भडकवण्यामागे अनिल बोंडेचा हात – नवाब मलिक

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: