राज्यात विक्रीस प्रतिबंध असलेल्या गुटखा, तंबाखू व वाहनासह पाच आरोपी जेरबंद

0 157

अहमदनगर –  अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत  महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंध असलेल्यागुटखा,तंबाखू आणि वाहनासह पाच आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेने १५ लाख ६२ हजार ३०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई अहमदनगर पोलीस अधीक्षक मनोज पाटील,सौरभकुम अग्रवाल अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर व अजित पाटील उपविभागीय पोलॉज अधीकारी, नगर ग्रामीण विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस अधिकारी व अमंलदार यांनी केलेली आहे.

या प्रकारात मिळालेली अधिक माहिती अशी कि ०४ सप्टेंबर रोजी अनिल कटके, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना गोपनिय माहिती मिळाली कि, अशोक लेलँड टेम्पो नं. एमएच १६ सीसी ४९२० व टेम्पो नं. एमएच-१६ सीसी ३६२१ या दोन टेम्पो मधून काही इसम हे दौंड ते अहमदनगर रोडने महार, राज्यात विक्रीस प्रतिबंध असलेला गुटखा विक्री करण्यासाठी घेवून अहमदनगर शहराचे दिशेने येत आहेत. आत लागलीच नगर-दौंड रस्त्यावरील अरणगाव चौक या ठिकाणी जावून सापळा लावल्यास मिळून येतील अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी व अंमलदार यांना मिळालेल्या माहितीनुसार खात्री करून कारवाई करणे बाबत आदेश दिले.

त्यानंतर पथकातील सपोनि / गणेश इंगळे, सपोनि सोमनाथ दिवटे, सफो / मन्सूर सय्यद, पोहेकॉ / संदीप पवार, संदीप घोडके, दिनेश मोरे, पोना/शंकर चौधरी, लक्ष्मण खोकले, सचिन आडबल, रवि सोनटक्के, दिपक शिंदे, पोकॉ/ राहूल सोळंके, कमलेश पाथरुट, योगेश सातपुते अशांनी मिळून दोन पंचासह खाजगी वाहनाने अरणगाव चौक या ठिकाणी जावून सापळा लावला. त्यानंतर काही वेळातच बातमीमधील नमुद क्रमांकाचे दोन लहान टेम्पो दौंड बाजूकडून अहमदनगर शहराचे दिशेने येत असल्याचे पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी एकाच वे रस्त्यावर येवून दोन्ही टेम्पो चालकांना त्यांचे टेम्पो थांबविण्याचा इशारा केला. टेम्पो चालकांनी रस्त्याचे कडे टेम्पो थांबविताच दोन्ही टेम्पो चे चालक व त्यांचे समवेत असलेले दोन इसम यांना ताब्यात घेवून त्यांना पोलीस स्टाफ व पंचाची ओळख सांगून त्यांना त्यांची नावे, पत्ते विचारले असता त्यांनी त्यांची नावे, पत्ते १) शेख नासिर अहमद चाँदमिया, वय ४४ वर्षे, रा. गाडेकर गल्ली, भिंगार, (टेम्पो नं. एमएच १६ सीसी ४९२० वरील चालक, २) शेख अय्याज नसीर, वय ३९ वर्षे, रा. मोमीन गल्ली, भिंगार, ३) आबेद नासिर शेख, वय- ३४ वर्षे, रा. नगरदेवळा, ता. नगर (टेम्पो नं. एमएच-१६ सीसी ३६२१ वरील चालक), ४) सय्यद असीफ महेमूद, वय ४२ वर्षे, रा. मोमीन गल्ली, भिंगार असे असल्याचे सांगितले. वरील नमुद इसमांचे ताब्यात असलेल्या दोन्ही टेम्पोंची पंचासमक्ष झडती घेतली असता महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंध असलेला हिरा कंपणीचा गुटखा तसेच रॉयल ७१७ कंपणीची तंबाखू व दोन टेम्पो असा एकूण १५, ६२,३००/ रु. किं. चा मुद्देमाल मिळून आल्याने तो पंचासमक्ष जप्त करण्यात आला आहे.

जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाबाबत ताब्यात घेतलेल्या आरोपीकडे चौकशी केली असता त्यांनी टेम्पो एमएच १६ सीसी ४९२० मधील माल व टेम्पो हा शेख नूर अब्दुल रऊफ, रा. मोमीन गल्ली, भिंगार याचे मालकीचे असल्याचे सांगितले. तसेच टेम्पो नं. एमएच १६ सीसी ३६२१ हा सुध्दा शेख नूर अब्दुल रऊफ, रा. मोमीन गल्ली, भिंगार याचे मालकीचे असून त्यामधील माल हा सादीक खान इमाम पठाण, रा. नेवासा याचे मालकीचे असल्याचे सांगीतले. त्यावरुन आरोपींचा शोध घेवून आरोपी नामे ५) सादीक खान इमाम पठाण, वय – ४८ वर्षे, रा. नाईकवाडी पुरा गल्ली, नेवासा, ता. नेवासा हा मिळून आल्याने त्यास ताब्यात घेतले. तसेच आरोपी नामे ६) शेख अब्दुल रऊफ, रा. मोमीन गल्ली, भिंगार (फरार) याचा शोध घेतला असता तो मिळून आला नाही.

Related Posts
1 of 1,603

हे पण पहा – आमदारांच्या दबावातून गुन्हा, काळेंनी दाखवली सीडी पुन्हा दिले जाहीर आव्हान

वरील नमुद आरोपी हे महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंध असलेला गुटखा व तंबाखू विक्री करण्याचे उद्देशाने वाहतूक करीत असताना मिळून आल्याने त्यांचे विरुध्द पोकॉ/ २५०३ कमलेश हरिदास पाथरुट, वय- ३० वर्षे, नेमणूक- स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांनी नगर तालूका पो.स्टे. येथे दिलेल्या फिर्यादीवरुन गुरनं. ४९५/२०२१, भादिव कलम १८८, २७३, ३२८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील कार्यवाही नगर तालुका पो.स्टे. करीत आहेत.

“त्या “प्रकरणात छिंदम बंधूंचा जामीन अर्ज नामंजूर, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: