आधी युती केली आणि मग गद्दारी केली, नारायण राणेंचा शिवसेनेवर हल्लाबोल

0 394
 नवी मुंबई –    केंद्रीय  सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणेंनी (Narayan Rane) आज मुंबईमध्ये पत्रकार परिषद (Press conference) घेतली. या  पत्रकार परिषदेत त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्यासह उपमुख्यमत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) आणि शिवसेना (Shiv Sena) प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांचा आपल्या स्टाईल ने भरपूर समाचार घेतला आहे. त्यांनी राज्यामधील विविध प्रश्न उपस्थित करून महाविकास आघाडी सरकारवर (MVA) टीका केली आहे. तर शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांच्यावर टीका करत त्यांनी रात्री जे करायचं ते दिवसा करत असल्यानं संजय राऊतांना भान राहत नाही, अशा शब्दात निशाणा साधला आहे.(First formed an alliance and then betrayed, Narayan Rane attacked On Shiv Sena)
आधी युती केली आणि मग गद्दारी
Related Posts
1 of 1,518
या पत्रकार परिषदेत त्यांनी शिवसेनेवर टीका करताना म्हणाले की  तुम्ही जे जिंकून आलात ते मोदींच्या भरोश्यावर. आधी युती केली आणि मग गद्दारी केली. मिडीयाने काही लोकांना सांभाळून घेतलं, असंही राणे म्हणालेत. मोदी सरकार बहुमतात आहे, तुम्ही तिथे धडक मारणार, पण धडक कशी असते ते माहीत नाही वाटतं. दिल्लीला धडक मारायला आलात तर डोकं राहणार नाही जागेवर. डोक्याविना संजय राऊत दिसेल तिकडे, असा हल्लाबोल राणेंनी पत्रकार परिषदेत केला आहे.
भाजपवर, मोदींवर टीकेचा भडीमार करतायत, संपलं आता यांचं म्हणे. आता तुम्ही जे 56 आमदार आहात, ते मोदींमुळेच निवडणून आलेले आहात. अन्यथा आठच्यावर जात नाहीत तुम्ही, असाही टोला नारायण राणेंनी शिवसेनेला लगावला आहे.(First formed an alliance and then betrayed, Narayan Rane attacked On Shiv Sena)
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: