DNA मराठी

राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानात जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांना प्रथम पुरस्कार

0 198
Preventive order in Ahmednagar district for five days from tomorrow - Collector

प्रतिनिधी- DNA मराठी टीम

अहमदनगर  – शासनाच्या २०२१-२२ या वर्षाच्या ‘राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा’ या अभियानात अहमदनगर जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले (Dr. Rajendra Bhosale) (शासकीय अधिकारी गट) मध्ये राज्यस्तरावरील प्रथम पुरस्कार मिळाला आहे. या पुरस्कारांची शासन निर्णयाच्या माध्यमातून १८ एप्रिल २०२२ रोजी घोषणा करण्यात आली.

प्रशासनातील सेवांच्या गुणवत्तेमधील वाढ, लोकाभिमुखता व निर्णयक्षमता आणण्याकरिता तसेच सर्वांच्या सहकार्यातून उत्तम प्रशासन कार्यान्वीत करण्याकरिता ‘राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा’ हे अभियान राबविण्यात येते. या अभियानातंर्गत सहभाग तालुका, जिल्हा, विभाग व राज्यस्तरावरील स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी केलेली कार्यालये व सर्वोत्कृष्ट कल्पना / उपक्रम सुचविणाऱ्या शासकीय संस्था, अधिकारी व कर्मचारी यांना पारितोषिके देण्यात येतात.
Related Posts
1 of 2,452
या अभियानातील प्रशासकीय गतिमानता अंतर्गत शासकीय अधिकारी गटातील राज्यस्तरावरील प्रथम पुरस्कार अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांना मिळाला आहे. रोख ५० हजार रूपये, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी महसूल विभागातील विविध प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी तसेच शेतकरी व नागरिकांचे दैंनदिन प्रश्न त्वरित निकाली काढण्याकरिता जिल्ह्यात ‘महसूल विजय सप्तपदी’ अभियान राबविले. यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी हक्काचे रस्ते मिळाले. गावांना स्मशानभूमी, तुकडेजोड, बेघरांना घरे मिळाली. ‘अमृत जवान सन्मान’ अभियानाद्वारे देशासाठी प्राणांची बाजी लावणाऱ्या जवानांच्या कुटुंबीयांच्या सर्व प्रश्नांची लांबीचे सोडवणूक केली. ऑक्सिजननिर्मिती प्रकल्प, रस्ते, अग्निशामक लांबी यंत्रणा उभारणीतही उच्चांक प्रस्थापित केला आहे. या त्यांच्या सर्वांगीण कामगिरीची दखल घेत शासनाने त्यांचा राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानातील  पुरस्कार देऊन कामाची दखल घेतली आहे.
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: