कल्याण रोडवर दिपावली निमित्त फटाका मार्केट सुरु, महापौर शेंडगे यांच्या हस्ते शुभारंभ

0 50

अहमदनगर – फटाका विक्रेत्यांवर काल पासून असलेले चिंतेचे मळभ अखेर महापौर रोहिणी शेंडगे (Mayor Rohini Shendge) यांनीच दूर करत, आज नवे आदेश येताच कसलाही विलंब न करता महापौर शेंडगे यांनी आज बुधवारी अहमदनगर फटाका असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत फटाका मार्केटचा औपचारिक शुभारंभ केला.दिवाळी सण जवळ आल्याने लगबग व तयारी सुरु झाली आहे. दिवाळीत फटाक्यांना महत्व आहे. नगरच्या फटाका व्यापारी असोसिएशनच्या वतीने कल्याण रोडवर होलसेल फटाका विक्री मार्केट सुरु झाले आहे. महापौर रोहिणी शेंडगे यांच्या हस्ते आज बुधवारी फीत कापून फटाके विक्री मार्केटचे व प्रवेशद्वाराचे उत्घाटन करण्यात आले.(Firecracker market started on Kalyan Road on the occasion of Diwali, inaugurated by Mayor Shendge)

यावेळी श्रीविशाल गणपती मंदिराचे पुजारी संगमनाथ महाराज यांचे शिष्य आदित्यनाथ महाराज, नगरसेवक सचिन शिंदे, नगरसेवक श्याम नळकांडे, सुवर्णा जाधव, दत्ता जाधव, फटाका व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष श्रीनिवास बोज्जा, सचिव संतोष बोरा, उपाध्यक्ष सोमनाथ रोकडे, सहसचिव अरविंद साठे, कार्याध्यक्ष सुरेश जाधव आदींसह सदस्य उपस्थित होते.

 हे पण पहा  – कुणाला रुपया भेटू देणार नाही पोलीस स्टेशन ला.नेवासा नंतर पाथर्डी पोलिसांची ऑडियो क्लिप

Related Posts
1 of 1,463

महापौर रोहिणी शेंडगे म्हणाल्या, दिवाळी सण सर्वाना आनंद देणारा सण आहे. करोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने सर्वत्र उत्साहाचे वातावरण झाले आहे. फटाका विक्री बंदी बाबतचा अध्यादेश नुकताच मागे घेण्यात आलेला असल्याने सर्व संभ्रम दूर झाले आहेत. त्यामुळे नागरिकांनी मोठ्या उत्साहात व आनंदात दिवाळी साजरी करावी. (Firecracker market started on Kalyan Road on the occasion of Diwali, inaugurated by Mayor Shendge)

काँग्रेसमध्ये इनकमिंग …….! राजकीय गोटात हालचालींना वेग

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: