जिल्हा रुग्णालयात भीषण आग, मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयांची मदत – राजेश टोपे

0 356
अहमदनगर –  अहमदनगर जिल्हा रूग्णलयात (Ahmednagar District Hospital) लागलेल्या भीषण आगीची सखोल चौकशी करून हलगर्जीपणास जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी दिले असून राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी देखील या आगीत मुत्यू झालेल्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच राजेश टोपे यांनी जिल्हा प्रशासनाला या घटनेची सखोल चौकशी करून आठवडाभरात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहे. (Fire breaks out at district hospital, Rs 5 lakh assistance to relatives of the deceased – Rajesh Tope)
या दुर्घटनेमध्ये आता पर्यंत १० जणांचा मुत्यू झाला असून १३ ते १४ रुग्ण गंभीर स्वरुपाचे जखमी झाले आहे. या रुग्णांना पुढच्या उपचारासाठी खाजगी रुग्णलयात दाखल करण्यात आला आहे. शनिवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास जिल्हा रुग्णालयातील तळमजल्यावर ही आग  लागली होती. यावेळी जवळपास २० ते २५ रुग्ण उपचार घेत होते. ही आग अहमदनगर महापालिकेच्या अग्निशामक पथकामार्फत (Ahmednagar Municipal Corporation Fire Brigade)  वीजवण्यात आली आहे. मात्र आता पर्यंत ही आग कशी लागली याचा स्पष्ट कारण समोर आलेला नाही. या दुर्घटनेमध्ये रामकिसन विठ्ठल राम किसन  हरगुडे ,सिताराम दगडू जाधव, सत्यभामा शिवाजी घोडेचोर , कडू बाई गंगाधर खाटीक ,शिवाजी सदाशिव पवार, कोंडाबाई मधुकर कदम, आसराबाई गोविंद नागरे, शाबाबी अहमद सय्यद,  दीपक विश्‍वनाथ जडगुळे आणि एक अनोळखी पुरुष अशी मृतांची नावे आहेत.
Related Posts
1 of 1,603
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar) यांनी देखील या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त करून मृतांच्या नातेवाईकांबद्दल सहसंवेदना व्यक्त केल्या आहेत . तर या दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सर्व प्रतिबंधक उपाययोजना करावी असे निर्देश दिले आहे.(Fire breaks out at district hospital, Rs 5 lakh assistance to relatives of the deceased – Rajesh Tope)
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: