अहमदनगर शहरात किराणा दुकानाला आग; दुकानाचा मोठा नुकसान

0 341
Fire at a grocery store in Ahmednagar city; Large damage to the shop
प्रतिनिधी- DNA मराठी टीम
अहमदनगर –   अहमदनगर शहरातील (Ahmednagar City) सावेडी (Sawedi)उपनगरातील भिस्तबाग रोड (Bhistbagh Road) परिसरात असणाऱ्या एसआर किराणा दुकानाला (SR Grocery Store) बुधवारी सकाळी आग लागल्याची माहिती समोर आली आहे. या आगीमध्ये दुकानाचा मोठा नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झालेली नाही.  शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज आहे.
Related Posts
1 of 2,177
मिळालेल्या माहितीनुसार इमारतीच्या तिसऱ्या मजल्यापर्यंत आगीचा झळा पोहोचला होता. यामुळे तिसऱ्या मजल्यावर असणाऱ्या आठ जण अडकले होते. अग्मिशामक दालाच्या जवानांनी आग अटोक्यात आणून अडकलेल्यांची सुटका केली.

 

बुधवारी सकाळी ही घटना घडली तेव्हा दुकान बंद होते. दुकानातून आगीचे लोट बाहेर येत असल्याचे दिसल्यावर आग लागल्याचे लक्षात आले. स्थानिक नागरिकांनी दुकानाकडे धाव घेतली. त्यानंतर महापालिकेच्या अग्निशमन दलाला कळविण्यात आले. आगीमुळे दुकानाचे शटर अडकले होते. त्यामुळे ते उघडत नव्हते. शेवटी ते शटर तोडावे लागले. यात बराच वेळ गेला. या कालावधीत आग दुकानाच्या आतून मोठ्या प्रमाणात पसरली. शटर तोडल्यानंतर अग्निशमन दलाच्या कर्मचार्‍यांनी दुकानात प्रवेश करत आगीवर पाणी मारले.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: