अखेर श्रीगोंदयाला मिळाले मिलिंद कुलथे तहसीलदार ….

0 223

श्रीगोंदा :-  श्रीगोंदयाचे (Shrigonda) तत्कालीन तहसीलदार महेंद्र माळी यांच्या बदलीपासूनच चर्चेत आलेले व श्रीगोंदा तहसीलदार म्हणून बदलून येण्यासाठी इच्छुक असणारे मिलिंद शालीग्राम कुलथे यांची अखेर श्रीगोंदा तहसीलदारपदी नियुक्ती झाली आहे.

Related Posts
1 of 1,622
श्रीगोंदा तालुका हा तसा नेहमीच कुठल्या ना कुठल्या बाबतीत चर्चेत राहणारा तालुका मग ते श्रीगोंदयाचे राजकारण असो वा अधिकाऱ्यांचे कामकाज,अधिकारी व राजकीय नेत्यांचे हितसंबंध किंवा अधिकाऱ्यांनी आपली मर्जी न राखल्यामुळे राजकीय नेत्यांचे अधिकाऱ्यांशी होणारे वाद,किंवा आपण अधिकारी आहोत या आविर्भावात जनतेला अपमानस्पद वागणूक देणारे अधिकारी व त्यामुळे काही महिन्यातच त्यांना गाशा गुंडाळून जाण्याची त्यांच्यावर आलेली वेळ हे सर्व श्रीगोंदेकरांनी अनुभवलेले आहे.

श्रीगोंदा तालुका हा तसा पोलीस आणि महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या दृष्टीने क्रीम पॉकेट असणारा तालुका त्यामुळे श्रीगोंदयात काम करण्यासाठी या दोन्ही विभागातील अनेक अधिकारी इच्छुक असतात श्रीगोंदयाला बदलून येण्यासाठी हवी ती किंमत मोजण्याची अधिकाऱ्यांची तयारी असते अशी चर्चा नेहमी ऐकायला मिळते त्याचप्रमाणे आपले सांगेल ते काम ऐकणारा,आपली मर्जी राखणारा अधिकारी तालुक्यातील राजकीय नेतेमंडळींना हवे असतात त्यामुळे या दोघांच्या छुप्या युतीमधून श्रीगोंद्यात येण्यासाठी अनेकजण फिल्डिंग लावतात.

श्रीगोंदयाचे तत्कालीन तहसीलदार महेंद्र माळी यांची बदली झाल्यानंतर प्रदीपकुमार पवार यांच्यासोबतच आता श्रीगोंदा तहसीलदार पदी नियुक्त झालेले तहसीलदार मिलिंद कुलथे यांचही नाव त्याचवेळेस चर्चेत होत श्रीगोंदा तहसीलदार पदासाठी या दोघांच्यात जणू रस्सीखेच सुरू होती असेच चित्र पहायला मिळाले होते पण त्यावेळी तहसिलदारपदी प्रदीपकुमार पवार यांनी बाजी मारली व कुलथे यांचा पत्ता कट झाला.

परंतु अनुभवाचा अभाव,राजकीय नेते व सामान्य जनतेचा रोष यामुळे पवार यांची अवघ्या काही महिन्यातच श्रीगोंदा तहसीलपदावरून बदली झाली पवार यांच्या बदलीचा आदेश येण्याआधीच मिलिंद कुलथे हेच श्रीगोंदयाचे तहसीलदार होणार हे निश्चित झाले होते त्यानुसार आता धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत असणारे मिलिंद शालीग्राम कुलथे यांची ठरल्याप्रमाणे श्रीगोंदा तहसीलदार पदी नियुक्ती झाली आहे.

अपेक्षांचा भार,समन्वय राखून काम करण्याची गरज 

जनसामान्यांची तहसील कार्यालयाशी निगडित अनेक कामे असतात त्यामुळे अधिकाऱ्याने निव्वळ आपल्या पदाचा रुबाब न गाजवता आपण जनसेवक आहोत ही जाणीव ठेवून आपले ऐकून घेऊन त्या समस्येवर तोडगा काढावा ही सामान्य माणसाची अपेक्षा असते त्यामुळे नव्याने येणारे तहसीलदार कुलथे यांना सामान्यांच्या समस्या सोडवून त्यांच्या कामाला प्राधान्य देत सर्वच राजकीय,सामाजिक,विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी समन्वय राखून काम करणे हे त्यांच्यापुढे आवाहन असणार आहे.
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: