आखेर नवज्योतसिंग सिद्धू यांनी सोडला मौन, म्हणाले ………..

0 380
चंडीगढ –   काँग्रेस(Congress) शासित पंजाब (Punjab) राज्यात मागच्या काही महिन्यापासून सुरु असलेल्या काँग्रेस पक्षातील अंतर्गत वाद मिटवून राज्याला नवीन मुख्यमंत्री काँग्रेस हाईकमांडने दिला होता मात्र परत एखादा काँग्रेस पक्षातील अंतर्गत वाद समोर आला असुन अचानक पंजाब काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदावरून नवज्योतसिंग सिद्धू (Navjyot Singh Sidhu) यांनी राजीनामा दिल्याने त्यांच्याबद्दल प्रसारमाध्यमात आणि सोशल मीडियावर अनेक चर्चांना उधाण आला आहे.
याच दरम्यान नवज्योतसिंग सिद्धू यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर पहिल्यांदा या विषयवार आपली प्रतिक्रिया दिली आहे. राज्याचे पोलीस महासंचालक, महाधिवक्ता आणि ‘कलंकित’ नेते यांच्या नियुक्त्यांवर प्रश्नचिन्ह लावले. आपण ‘कुठलाही त्याग’ करण्यास तयार आहोत, मात्र नेहमीच आपल्या तत्त्वांवर कायम राहू असे ते म्हणाले.

चरणजितसिंग चन्नी (Charanjit Singh Channi) यांच्या नेतृत्वाखालील नव्या राज्य मंत्रिमंडळातील सदस्यांना मंगळवारी खातेवाटप करण्यात आल्यानंतरच काही वेळातच सिद्धू यांनी पदाचा राजीनामा दिला. त्यांच्या या कृतीमुळे, राज्य विधानसभा निवडणुकांच्या काही महिने आधी काँग्रेसपुढे नवे संकट उभे  ठाकले आहे. परगत सिंग व अमरिंदर सिंग राजा वारिंग हे मंत्री, आमदार इंदरबीर सिंग बोलारिया व पंजाब काँग्रेसचे कार्याध्यक्ष पवन गोयल यांनी सिद्धू यांच्या पतियाळातील घरी जाऊन त्यांची भेट घेतली.

Related Posts
1 of 1,640

हे पण पहा  –उस्मानाबादमध्ये शेतकऱ्यांनी अडवला पालकमंत्री शंकरराव गडाख यांचा ताफा | दादा मला पाच मिनिट वेळ द्या

लोकांच्या आयुष्यात सुधारणा करणे आणि ‘बदल घडवणे’ हा आपला नेहमीच उद्देश राहिला आहे, असे सिद्धू यांनी ट्विटरवर लिहिले. आजवर माझा कुणावरही वैयक्तिक राग राहिलेला नाही, किंवा मी वैयक्तिक लढायाही लढल्या नाहीत. माझा लढा मुद्यांवर आणि पंजाबशी संबंधित अ‍ॅजेंडय़ाबद्दल राहिलेला आहे, असे सिद्धू म्हणाले. वरिष्ठ आयपीएस अधिकारी इक्बालप्रीत सिंग सहोटा यांना पंजाबच्या पोलीस महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे, याबाबत सिद्धू यांनी हरकत घेतली. एपीएस देओल यांच्या राज्याचे महाधिवक्तापदी नियुक्तीवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्याचप्रमाणे ज्यांच्या नावावर अनेकांनी आक्षेप घेतला होता, त्या राणा गुरजित सिंग यांच्यासारख्या ‘कलंकित’ लोकांचा मंत्रिमंडळात समावेश करण्याबाबत त्यांनी अप्रत्यक्ष शब्दांत आक्षेप नोंदवला.

तिसऱ्या पतीपासून विभक्त होणार ‘ही’ चर्चित अभिनेत्री, जाणून घ्या कारण

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: