परीक्रमा’ औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयाचा अंतिम वर्ष बी. फार्मसीचा १०० % निकाल

0
 श्रीगोंदा-    काष्टी येथील बबनराव पाचपुते विचारधारा ट्रस्टच्या ‘परीक्रमा’ औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयातील अंतिम वर्ष बी. फार्मसी (सत्र ७) चा निकाल १०० % लागला असल्याची माहिती महाविद्यालयाचे परीक्षा प्रमुख प्रा. जयदीप पवार यांनी दिली.
तुपे सुरज अंकुश (एस जी पी ए– ९.६४५) प्रथम क्रमांकाने, सोनटक्के भाग्यश्री नामदेव (एस जी पी ए – ९.०६५) द्वितीय क्रमांकाने, तर दंडवते मधुराणी संतोष (एस जी पी ए – ९.०३२) तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याची माहिती प्राचार्य डॉ. सुनील निर्मळ यांनी दिली.

“ते” 0. 05 टक्के विद्यार्थी नापास का ?, शिक्षण मंडळ म्हणतो ….

Related Posts
1 of 1,153
परीक्रमा शैक्षणिक संकुलात दर्जेदार शिक्षणावर अधिकाधिक भर दिला जातो अशी माहिती संस्थेचे प्रमुख कार्यकारी अधिकारी श्री. प्रतापसिंह पाचपुते यांनी दिली. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे संस्थेच्या अध्यक्षा डॉ. सौ. प्रतिभाताई पाचपुते, सचिव विक्रमसिंह पाचपुते, मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. अनिल पुंड, संकुल संचालक डॉ. विजय पाटील व डी. फार्मसी चे प्राचार्य प्रा. रमेश शिंदे यांनी अभिनंदन केले.
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: