रस्त्याच्या जागेतून दोन गटात मारामारी ,परस्पर विरोधी तक्रारी दाखल

0 220
 श्रीगोंदा :-  श्रीगोंदा तालुक्यातील घारगाव येथे रस्त्याच्या जागेच्या वादातून दोन गटात  (Two Groups) लोखंडी गजाने तुंबळ मारामारी (Fighting)  झाली असुन या मारामारीत दोन गटातील काही जण जखमी झाले . या प्रकरणी दोन्ही गटातील दोघांनी दिलेल्या फिर्यादीवरून दहा जणांच्या विरोधात बेलवंडी पोलिस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हा दाखल करण्यात आहेत.  ही घटना रविवारी  संध्याकाळी व सोमवारी सकाळी घडली आहे. मात्र याबाबत जखमींची परिस्थिती मोठ्या प्रमाणात गंभीर असल्याने वाढीव कलम लागण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे .
शुभम  परदेशी  यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मी माझ्या शेतातील जनावरांसठीग गवत गट क्रमांक४४८,४५५ मधील रस्त्याने जात असताना  दत्तात्रय पानसरे, अर्चना पानसरे, महेश  पानसरे, सुनील पानसरे, किसन पानसरे, राधाबाई किसन पानसरे यानी मला अडवत लाथा बुक्याने मारहाण केली पुन्हा या रस्त्याने आला तर तलवारीने जीवे मारून टाकू अशी धमकी दिली ही घटना रविवारी संध्याकाळी पाच वाजता घडली आहे तर दुसरीकडे नारायण  वाळके यांनी दिलेल्या फिर्यादीत नमुद केले आहे कि मी महेश पानसरे यांच्या शेतात दत्तात्रय भाऊसाहेब पानसरे यांचा जेसीबी सपाटीकरण करत होता .
Related Posts
1 of 1,608
हा जेसीबी आणण्यासाठी गेलो असता मागील भांडणाचा राग धरुन नारायण परदेशी, शिवाजी परदेशी, शुभम परदेशी, योगेश परदेशी यांनी लाथा बुक्यानी व लोखंडी गजाने मारहाण केली  ही घटना  सोमवारी सकाळी ८  वाजण्याच्या सुमारास  घडली  पुढील तपास पोलिस हेड काॅस्टेबल मधुकर सुरवसे करत आहेत . मात्र या दोन्ही प्रकरणात काही लोकांना मोठ्या प्रमाणात मारहाण झाली आहे त्यामुळे सदर गुन्ह्यात वाढीव कलम लागण्याची शक्यता नाकारता येत नाही असेही पोलीस अधिकारी यांनी सांगितले आहे.
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: