फर्निचरच्या गोडाऊनला भीषण आग, पहा हा भीषण आगीचा व्हिडिओ

0 304
पुणे –  अहमदनगर जिल्हा रुग्णालयामध्ये (Ahmednagar District Hospital) शनिवार दि. ०७ नोव्हेंबर रोजी आग लागली होती.  या आगीत अकरा जणांचा मुत्यू झाला होता. ही घटना ताजी असताना परत एकदा राज्यात आग लागल्याची घटना घडली आहे.  पुणे (Pune) मधील पिंसोळी (Pinsoli) येथील दगडे वस्तीमध्ये एका फर्निचरच्या गोदामाला (Furniture godown) पहाटेच्या सुमारास भीषण आग (Fierce fire) लागली आहे. अग्निशमन दलाला या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी तब्बल ३ तासांचा कालावधी लागला. ही आग का लागली अद्याप याचा कारण समोर आलेला नाही. (Fierce fire at furniture godown, watch this video of a fierce fire)
मिळालेल्या माहितीनुसार पिसोळी येथील दगडे वस्तीत पहाटे साडेतीनच्या सुमारास एका फर्निचरच्या गोदामाला आग लागली. या आगीची घटना समजताच पुणे व पीएमआरडीएच्या १४ अग्निशमन गाड्या घटनास्थळी पोहचल्या. गोदाम मालकाने हे गोदाम दोघांना भाड्याने दिले आहे. सुमारे २४ हजार स्क्वेअर फुट असलेल्या या गोदामात फर्निचरचे सर्व लाकडी सामान होते.

धक्कादायक ! किरोकोळ कारणावरुन पतीने केली पत्नीची डोक्यात फोवडा टाकून हत्या

Related Posts
1 of 1,603

रात्रीची वेळ असल्याने गोदामात कोणी नव्हते. गोदाम मालक जवळच राहतात. आग लागल्यानंतर तिने रौद्र रुप धारण केल्यानंतर पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास अग्निशमन दलाला आगीची खबर मिळाली. लाकडी साहित्य असल्याने त्याने पटकन पेट घेतला. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहचल्या, तोपर्यंत आगीने भीषण स्वरुप धारण केले होते.(Fierce fire at furniture godown, watch this video of a fierce fire)

हे पण पहा –  जिल्हा रुग्णालयात भीषण आग, मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयांची मदत – राजेश टोपे

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: