फर्निचर कारखान्यांना भीषण आग.., 5 कारखाने जळून खाक

0 209

 नवी मुंबई –    मुंबईमधील भिवंडी (Bhiwandi) परिसरात परत एकदा भीषण आग ( Fire ) लागली आहे. या आगीत तब्बल 50 हून अधिक गोदाम (Warehouse) जळून खाक झाली आहेत. तर 5 कारखाने (Factories)  जळून खाक झाले असल्याची माहिती समोर आली आहे. ही आग शुक्रवारी (15 ऑक्टोबर) रात्री अकरा वाजताच्या सुमारास भिवंडी ठाणे रस्त्यावरील कशेळी हद्दीतील चामुंडा कॉम्प्लेक्स येथील फर्निचर बनविणाऱ्या कारखान्यात लागली आहे.  (Fierce fire at furniture factories .., 5 factories burnt down)

आग ही शॉर्ट सर्किटने लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. सर्व कारखाने हे पत्र्याच्या शेडमध्ये असल्याने ही आग सर्वत्र पसरली. ज्यामुळे कोट्यावधी रुपयांचे साहित्य कच्चा माल जळून खाक झाला आहे. या आगीत मिळालेल्या माहितीनुसार कोणतीही जीवित हानी झाली नाही .महत्वाचे असे आहे की याच विभागातून पेट्रोल व केमिकलची लाईन देखील गेली आहे.

धक्कादायक ! चवदार सांभार बनवले नाही म्हणून आई आणि बहिणीची हत्या

Related Posts
1 of 1,463

या सर्व कारखान्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर लाकूड, कापूस, फोम आणि रेक्झीन साठविलेले असल्याने ही आग पाहता पाहता सर्व कारखान्यात पसरुन सर्व कारखाने जळून बेचिराख झाले आहेत. या आगीची माहिती मिळताच भिवंडी, कल्याण, ठाणे येथील अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी आग विझविली. घटनास्थळी पाण्याची उपलब्धता नसल्याने आग विझविण्यात अडथळा येत होता. मात्र, पाणी नियमित उपलब्ध झाल्याने आग पूर्णतः नियंत्रणात आली आहे. अशी माहिती ठाणे बाळकुम अग्निशामक केंद्रातील अधिकारी हिंदुराव बोंडवे यांनी दिली आहे.(Fierce fire at furniture factories .., 5 factories burnt down)

 हे  पण पहा –  शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्या… | आ. मोनिका राजळे आक्रमक

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: