Ahmednagar जिल्हा रुग्णालयात भीषण आग, वाचा सविस्तर माहिती

0 515
अहमदनगर  –  आज ( शनिवार ) रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या (Ahmednagar District Hospital) अतिदक्षता विभागाला भीषण आग (Terrible fire) लागली आहे. या ठिकाणी मिळालेल्या माहितीनुसार ५ ते १० रुग्णांचा मुत्यू झाला असून १३ ते १४ रुग्ण गंभीर स्वरूपाचे जखमी झाले आहे.मात्र अद्याप किती जण मृत्यू पावले याबाबत जिल्हा रुग्णालय कडून स्पष्टीकरण देण्यात आले नाही. आग लागलेल्या ठिकाणी  20 ते 25 जण उपचार घेत होते. रुग्णालयाच्या तळमजल्यावर ही आग लागली.(Fierce fire at Ahmednagar district hospital, read detailed information)
अहमदनगर महानगर पालिकांच्या अग्निशामक पथक (Ahmednagar Municipal Corporation Fire Brigade)  मार्फत आग वीजवण्यात आली आहे. मात्र अद्याप ही आग लागण्याचा नेमका कारण समोर आलेला नाही. या प्रकरणात शहराचे आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap)  यांनी  सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
Related Posts
1 of 1,486
या आगीत संपूर्ण आय.सी.यु (ICU) जळून खाक झाले आहे. या ठिकाणी उपचार घेत असलेल्या काही रुग्णांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. या आगीत अनेक जण गंभीर स्वरूपाचे भाजल्याने मृतांची संख्या वाढण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.  या आगीची माहिती मिळताच जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hassan Mushrif) तातडीनं कोल्हापूरहून अहमदनगर कडे निघणार आहे. (Fierce fire at Ahmednagar district hospital, read detailed information)
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: