
राहुरी : सरकारी कर्मचारी यांच्या संपाच्या विरोधात राहुरी ग्रामस्थांनी केलेल्या आंदोलनाचे वेळी तहसील कार्यालयातील महिलांबाबत आपत्तीजनक, बदनामीकारक वक्तव्य करुन महिलांचा अपमान केला आहे. संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी तहसीलमधील कर्मचार्यांनी केली आहे.
सत्तेच्या नशेत नेत्यांकडून गैर कृत्यांचे प्रकार वाढ, राजकारणात डागाळलेली नेते, तरीही मी तो नव्हेच.
राज्य महिला आयोग अध्यक्ष रुपालीताई चाकणकर यांना निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, आम्ही महिला अधिकारी व कर्मचारी राहुरी तहसील कार्यालयात वेगवेगळया पदावर कार्यरत आहोत. जुनी पेन्शन लागू करावी यासाठी सरकारी कर्मचारी यांनी १४ मार्चपासून बेमुदत संप पुकारला होता. या संपाच्या काळात कर्मचारी कामावर येत नव्हते. शासनाकडून मिळालेल्या आश्वासनानंतर सदर संप मागे घेण्यात आला.
त्या भाषणावर महसूल मधील महिला आक्रमक…
दरम्यान २१ मार्चला सरकारी कर्मचारी यांच्या आंदोलनाच्या विरोधात राहुरी परिसरातील ग्रामस्थांनी मोर्चा काढला. या मोर्चाचे रुपांतर नंतर सभेत झाले. ही सभा राहुरी तहसील कार्यालयाचे आवारात घेतली गेली. त्यावेळी साधारणतः २० ते ३० लोकांचा जमाव जमा झालेला होता. जमावामध्ये परिसरातील जमलेल्या व्यक्ती, कार्यकर्ते व ग्रामस्थ यांचे भाषण झाले. ग्रामस्थांचा रोष विशेषतः कर्मचारी महिला यांच्या विरोधात होता. परिसरातील प्रकाश देठे नामक व्यक्तीने शासकीय कर्मचारी यांच्याबद्दल अपशब्द वापरुन विशेषतः महिलांबद्दल त्यांचा अपमान होईल व समाजात त्यांची बदनामी होईल असे वक्तव्य केले आहे.
दूध भेसळीवर कारवाई सूत्रधारापर्यंत पोहचण्याचे आव्हान
तहसील कार्यालयात एक महिला आहे. तिचा मोठा ढाबा असून ती रोज संध्याकाळी बाटली घेऊन बसते. अशाप्रकारे महिलांबद्दल आपत्तीजनक कथन करुन समस्त तहसील कार्यालयातील महिलांचा अपमान केला व नागरिकांमध्ये आमचेबद्दल रोष व तेढ निर्माण होईल असे वक्तव्य केले. त्यामुळे समस्त महिला कर्मचारी वर्गामध्ये त्याबाबत असुरक्षितता निर्माण झाली आहे. तसेच सदर महिला कर्मचारी यांचे मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न या प्रकाश देठे नावाच्या व्यक्तीने भर सभेत केला आहे. त्यास इतर लोकांनी देखील दुजोरा दिला आहे. अशाप्रकारे एक उद्देश ठेऊन महिलांची बदनामी केली आहे. तसेच तहसील कार्यालयातील महिलांच्या चारित्र्याविषयी बेताल वक्तव्य करुन महिलांना लज्जा उत्पन्न होईल, असे वक्तव्य केलेले आहे.
संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी राहुरी तहसीलमधील महिला कर्मचार्यांनी निवेदनाद्वारे केली आहे. हे निवेदन राहुरी पोलिस निरीक्षक व राज्य महिला आयोग अध्यक्ष रुपालीताई चाकणकर यांना देण्यात आले आहे.