बोगस बियाण्यांमुळे शेतकरयांना बसला मोठा फटका ……

0 9

श्रीगोंदा ;- श्रीगोंदा तालुक्यात अनेक शेतकर्यांनी पेरलेले कांदा बियाणे बोगस असल्याचा  धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अस्मानी संकटावर मात करत हात उसनवारी करत न्हाळी कांद्याची लागवड केली, परंतु बियाणे बोगस निघाल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहे. शेतकऱ्यांनी पंचायत समितीतील कृषी विभागाकडे तक्रार देऊन नुकसान भरपाईची मागणी केली आहे.

ग्रामीण भागात गावठी दारूचा महापूर, पोलीस प्रशासनाने लक्ष देण्याची गरज

श्रीगोंदा तालक्यातील शेतकर्यांनी कांदा बियाणे खरेदी केले. दोन एकरमध्ये लागवड केलेल्या कांदे ८० टक्के टोंगळे व डिरले, पोकळ निघाल्यामुळे शेतकऱ्याचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. श्रीगोंदा येथील एका बियाणे विक्री करणाऱ्या केंद्रातून घेतलेल्या कांदा बियाणांची लागवड शेतकऱ्यांनी केली होती. बियाणे बोगस निघाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.  संपूर्ण  हंगाम वाया जाणार आहे. त्यामुळे त्यांचे आर्थिक उत्पन्नच शून्य होणार आहे. त्यामुळे आगामी वर्षाचे उपजीविकेचे साधन हिरावले गेले आहेत. बियाणे खरेदी व शेती मशागतीसाठी नातेवाईकांकडून  ‌घेतलेले हात उसनवारीचे पैसे ‌कसे‌ फेडायचे, ही विवंचना त्यांना सतावत ‌आहे. तसेच‌ श्रीगोंदा येथील एका केंद्रातून काही ‌शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी केले होते. मात्र लागवड केल्यानंतर ६० ते ७० दिवसानंतर कांद्याच्या पातीला टोंगळ‌, डिरले  निघाल्याने जमिनीत‌ कांदा तयार झाला नाही. त्यामुळे उत्पन्न निघणार नसल्याचे तक्रार शेतकऱ्यांनी केले आहे.

वाळूमध्ये सर्वांचेच हात बरबटलेले प्रत्येकाचे दर सोशल मीडियावरती जाहीर

Related Posts
1 of 1,292

शेतकऱ्याकडून घेतलेले बियाणे पण बोगस

श्रीगोंदा तालुक्यातील अनेक शेतकर्यांनी केवळ व्यवसाय म्हणून बाहेरगावातून कांदा बियाणे विक्रीसाठी आणले होते त्यात काही शेतकऱ्यांचे उगवलेच नाही तर काहीचे उगवून डेंगळे निघाले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांची सर्वच ठिकाणी फसवणूक झाली आहे याची दखल प्रशासनाने घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

शरद पवारांच्या नाराजीवर संजय राठोड यांनी अशी दिली आपली प्रतिक्रिया…

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: