DNA मराठी

कुकडीच्या पाण्यापासून शेतकरी वंचित, पिके धोक्यात

0 89
Farmers deprived of poultry water, crops in danger
श्रीगोंदा  –  कुकडीचे आवर्तन अंतिम टप्प्यात आले आहे मात्र तालुक्यातील 50% शेतकरी पाण्यापासून वंचित आहेत त्यामुळे पिके जळून जाण्याची भीती निर्माण झाली त्यामुळे शेतकऱ्यांच्या मध्ये असंतोषाची भावना निर्माण झाली आहे कुकडी लाभक्षेत्रात मोठे जलसंकट उभे राहणार आहे.
कुकडी प्रकल्प 6 हजार 541 एम सी एफ टी 22% उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे यामध्ये डिंबे धरणात 3 हजार 494 एम सी एफ टी आहे माणिकडोह धरणात एक टी एम सी पाणी शिल्लक ठेवून येडगाव मध्ये सोडण्यात येणारे पाणी बंद करण्यात आले आहे . येडगाव धरणात 1 हजार 136 एम सी एफ टी पाणी शिल्लक आहे कालव्याद्वारे 1 हजार 400 तर नदीत 800 क्युसेक ने पाणी सोडण्यात आले आहे  येडगाव धरणात 500 एम सी एफ टी शिल्लक ठेवण्यात आले तर चार पाच दिवसात कुकडीच्या आवर्तनाचा हर हर महादेव अटळ आहे.
विसापुर चे लाभक्षेत्र वगळता कुकडीच्या लाभक्षेत्रातील 50 शेतकरी पाण्यापासून वंचित आहेत या शेतकऱ्यांचा आपणास पाणी मिळेल का या चिंतेने जीव कासावीस होऊ लागला आहे . मुळात माणिकडोह धरणात 500 एम सी एफ टी शिल्लक ठेवून पाण्याचे नियोजन करण्यात आले असते तर श्रीगोंद्यातील शेतकऱ्यांवर पाण्यासाठी आक्रोश करण्याची वेळ आली नसती. ही वस्तुस्थिती आहे . पण सत्ताधारी मंडळीना काही सुचेना अन् विरोधक बोलेना शेतकरी आंदोलन करणाऱ्यांच्या मागे उभे राहीना अशी अवस्था आहे त्यामुळे शेतकऱ्यांना पाण्यासाठी मरण यातना सहन कराव्या लागत आहेत ही दुर्दैवाची बाब आहे.
Related Posts
1 of 2,482
डिंबे माणिकडोह बोगदा कधी होणार.. 
डिंबे माणिकडोह बोगद्याचा प्रवास सुरु 20 वर्षापुर्वी सुरू झाला मात्र मुहुर्तस्वरुप येत नाही तळपृष्ठ निश्चितीच्या नावाखाली आघाडी सरकारने या डिंबे माणिकडोह बोगद्याचा प्रश्न प्रलंबित ठेवला आहे शरद पवारांनी उपमुख्यमंत्री अजीत पवारांना अधिकार दिले आहेत पण अजीत पवारांना या प्रकल्पाची फाईल ओपन करण्यासाठी कधी वेळ मिळणार हाच सवाल आहे यापुढे धरणे 100 भरली तरी नगरकरांच्या पाण्याचा वनवास कायम राहणार हे निश्चित आहे.
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: