नान्नज येथील शेतक-याची नापीकीस व कर्जबाजारीपणा कंटाळून आत्महत्या

0 15

 जामखेड –   तालुक्यातील नान्नज येथील शेतकरी बाळु बाबुराव मोहळकर वय ४७ याने आपल्या दोन गाय दगावल्या व कर्ज बाजारी व नापिकीस कंटाळुन आपल्या शेतातील रहात्या घरात विषारी औषध प्राशन करून आपले जीवन संपवले. मोहळकर याच्या मृत्यूमुळे नान्नज गावात हळहळ व्यक्त होत आहे. सायंकाळी पाचच्या सुमारास शवविच्छेदना नंतर नान्नज येथील पांढरी मळा या ठिकाणी त्यांच्यावर अत्यसंस्कार करण्यात आले.

वीज बिलाच्या मुद्द्यावर चर्चा होत नाही, तोपर्यंत वीज कनेक्शन तोडणं थांबण्यात येईल -अजित पवार

एक मार्च रोजी युवक शेतकरी बाळु बाबुराव मोहळकर याने सकाळी दहाच्या सुमारास त्याच्या पांढरीचा मळा या शेतातील रहात्या घरी विषारी औषधाचे घेतले त्यास उलटी होऊ लागल्याने त्यांनी आपल्या घरातील नातेवाइकांना सांगितले त्यांनी शेजारील लोकांच्या मार्फत जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र दवाखान्यात पोहचण्यापुर्वीच त्याचा मृत्यु झाल्याने त्याच्या मृतदेहावर जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले शवविच्छेदनानंतर त्याचा मृतदेह नान्नज येथील त्याच्या रहात्या घरी आणण्यात आला.

बाबूर्डी तलाठ्याचा अजब प्रकार बनावट सह्या मारून जमीन केली हस्तांतर

Related Posts
1 of 1,290
त्यानंतर मोठया शोकाकुल वातावरणात पांढरीचा मळा येथे त्याच्यावर अत्यसंस्कार करण्यात आले यावेळी संपुर्ण गाव व पंचक्रोशीतील नागरीक मोठ्या संखेने उपस्थित होते मयत बाळु मोहळकर यांच्याकडे बॅक कर्ज तसेच शेतात नापीकीने परेशान त्यातच दुग्ध व्यवसायासाठी घेतलेल्या दोन गाया तापाच्या आजाराने मृत्यू झाले आपले कुटुंब चालवयाचे कसे या चिंतेत ते अस याच वैफल्यातुन त्यांनी आत्महत्या केली असावी असे गावकरी व कुंटुबाच्या वतीने सांगण्यात आले त्यांच्या मागे वृध्द आई वय ७० पत्नी निता वय ३४ मुलगा महेश वय १६ तर एक मुलगी निता वय १४ असा परिवार असुन बाळु मोहळकरच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबाचा आधारच हरपला आहे त्यामुळे शासनाच्या वतीने यांना त्वरीत मदत मिळावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

बाळ बोठेला फरार घोषित करण्यासाठी पोलिसांनी केला अर्ज

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: