भारत लोखंडे व बाळु गोरे यांचा निरोप समारंभ संपन्न

0 307
Farewell ceremony of Bharat Lokhande and Balu Gore
प्रतिनिधी DNA मराठी टीम 
श्रीगोंदा  :-  वनविभागा मध्ये कार्यरत असलेले कर्मचारी भारत  श्रीरंग लोखंडे व बाळु गोरे यांचा सेवानिवृत्त समारंभ माळढोक पक्षी अभयारण्य श्रीगोंदा या कार्यालयांमध्ये ३१मार्च २०२२रोजी सोहळा संपन्न झाला यावेळी उपस्थित वनपरिक्षेत्र अधिकारी  विवेक नातु साहेब   वनपाल हौसराव   गारुडकर  वनपाल राजू रायकर  वनपाल नितीन शिंदे वनरक्षक रामेश्वर मंडपे  वनरक्षक पंकज गुंजाळ  वनरक्षक आनंद तिवारी  वनरक्षक कृष्णा गायकवाड, वनरक्षक बाळकृष्ण बडे ,वनमजूर वसंत केदारी आदी मान्यवर उपस्थित होते.
Related Posts
1 of 2,420
यावेळी भावुक होऊन वन परिक्षेत्र अधिकारी नातू साहेब म्हणाले की मी स्वतः  व वनपाल गारुडकर वनरक्षक मंडपे यांच्या समवेत रात्री अपरात्री गस्त घालत असे त्यावेळी  फॉरेस्ट  गट नं ८०५  हा अतिशय अति संवेदनशील क्षेत्र असुन त्या मध्ये लोखंडे यांनी रात्री अपरात्री गस्त घालुन पशु पक्षी प्राणी यांचे  शिकार  करणाऱ्या लोका पासुन  संरक्षण करून वनचराय झाडतुटी ते आगीपासुन जंगलाचे संरक्षण करत पशुपक्षानां पिण्यासाठी पाण्याची सोय करत होते अशा प्रामाणिक कर्मचारी  असलेले भारत लोखंडे व बाळु गोरे दोन्ही कर्मचारी सेवानिवृत्त होत असल्याने दुःख होत आहे त्यानां पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: