शानदार एजाज! एकाच डावात घेतले 10 विकेट्स, रचला इतिहास

0 460

नवी मुंबई –  मुंबईमधील वानखेडे स्टेडियमवर सुरु असलेला भारत विरुद्ध न्यूझीलंड (India v New Zealand) यांच्यातील दुसऱ्या कसोटी (2nd test) सामन्यात न्यूझीलंडच्या फिरकीपटू गोलंदाज एजाज पटेल (Ajaz Patel) ने नवा इतिहास रचला आहे. एजाज ने एकच डावात 10 विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे.  यापूर्वी इंग्लंडच्या जीम लेकर Jim Laker (1956), भारताचा अनिल कुंबळे Anil Kumble (1990) यांनी एका डावात 10 विकेट्स घेण्याची किमया केली होती .एकाच डावात दहा विकेट घेणारा एजाज जगात तिसरा गोलंदाज बनला आहे.(Fantastic Ajaz! 10 Wickets taken in a single innings, made history)

टीम इंडियाने कालच्या ४ बाद २२१ धावसंख्येपुढे फलंदाजी करण्यास सुरुवात केली. भारताचा डाव १०९.५ षटकात ३२५ धावांत संपुष्टात आला.  एजाज पटेलने खेळाच्या दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा एजाजच्या फिरकीची जादू पहायला मिळाली. त्याने ९९.५ व्या षटकात शतकवीर मयंक अग्रवालला आपल्या जाळ्यात अडकवले.

डोंबिवली सामूहिक बलात्कार प्रकरण, ८८५ पानांचे आरोपपत्र दाखल

मयंकने ३११ चेंडूत १७ चौकार ४ षटकारांच्या जोरावर १५० धावा केल्या. त्यानंतर १०८ व्या षटकांच्या शेवटच्या चेंडूवर एजाजने अर्धशतकवीर अक्षर पटेलला पायचित केले.   अक्षरने १२८ चेंडूत एक षटकार आणि पाच चौकारांच्या मदतीने ५२ धावा केल्या. त्यानंतर १०९.२ व्या षटकांत जयंत यादवची विकेट घेवून तो विश्वविक्रमाच्या उंबरठ्यावर पोहचला. अखेर १०९. ५ व्या षटकात ती वेळ आणि सर्व क्रिकेट जग स्तब्ध झाले. कारण एजाजने मोहम्मद सिराजला बाद करत एकाच डावातील १० वा  विकेट्स मिळवले . (Fantastic Ajaz! 10 Wickets taken in a single innings, made history)

Related Posts
1 of 65

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: