बबिताचा “हा” लुक पाहून चाहते झाले इम्प्रेस, म्हणाले तू नेहमी …

0 1,293
नवी मुंबई –  तारक मेहता का उल्टा चश्मा (Tarak Mehata Ka Oolta Chashmah) ही मालिका देशात लोकप्रिय मलिक आहे. मागच्या १२ वर्षापासून ही मालिका सुरु आहे. यामुळे या मालिकेमध्ये काम करणारे अभिनेता आणि अभिनेत्री आपल्या खाजगी आयुष्यामुळे सतत सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनून राहतात. यातच एक अभिनेत्री म्हणजे मुनमुन दत्ता  (Munmun Dutta) ही होय .(Fans were impressed by Babita’s “this” look, saying you always …)

 मालिकेत बबिता जी  (Babita ji ) ची भूमिका साकारणारी ही अभिनेत्री नेहमी सोशल मीडियावर चर्चेत राहते. नुकताच तिने एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. तिचा हा नवा लूक पाहिल्यानंतर चाहते तिचं मोठ्या प्रमाणात कौतुक करत आहेत. या फोटोंसोबतच तिने तिची वेट लॉस  (Weight Loss)  जर्नी शेअर केली आहे.

मुनमुन दत्ताने या पोस्टद्वारे आपल्या टोन्ड बॉडीची सर्व गुपिते उघड केली आहेत. तिने पहिले दोन फोटो शेअर केले आहेत. ज्याद्वारे तिने पूर्वीचा आणि आताचा लूक यातील फरक दाखवला आहे. पहिल्या फोटोमध्ये तिने सूट घातला आहे. ज्यामध्ये तिचे वजन वाढलेलं आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये ती जिम लूकमध्ये आहे. ज्यामध्ये तिचे वजन कमी झालेले दिसत आहे.यासोबतच तिने आणखी काही फोटोही शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये मुनमुन दत्ता खूप आनंदी आणि फ्रेश दिसत आहे.

तिचा हा नवा लूक पाहून चाहते सतत कमेंट करत आहेत. तिचा हा नवा लूक लोकांना आवडला आहे. तिच्या फोटोवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले – ‘प्रगती तर झाली आहे…’. दुसर्‍याने लिहिले- ‘तू नेहमी जशी आहेस तशीच सुंदर आहेस.’ दुसर्‍या युजरने लिहिले- ‘आधी किंवा नंतर पण मी तुझ्यावर नेहमी प्रेम करणार्‍या जेठालालसारखा आहे.’ चाहते त्यांना हार्ट आणि फायर इमोजी शेअर करत आहेत.(Fans were impressed by Babita’s “this” look, saying you always …)

धक्कादायक ! बलात्कार पीडितेला मदतीच्या बहाण्यानं लुटलं, गुन्हा दाखल

Related Posts
1 of 96
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: