नियमबाह्य पोस्ट करणाऱ्या ग्रुप्सवर फेसबुक करणार कारवाई 

0 9

 नवी दिल्ली – मागच्या काही दिवसापूर्वी धोकादायक कंटेंट डिलीट न केल्यामुळे वादात सापडलेल्या फेसबुकने आता फेसबुक ग्रुप वर येणाऱ्या धोकादायक कंटेंट कमी करण्यासाठी आपली नवीन नियमावली जाहीर केली आहे. या नवीन नियमामुळे आता धोकादायक असणाऱ्या कंटेंट ग्रुप्सवर मर्यादा येतील अशी माहिती फेसबुकने दिली आहे .

फेसबुकच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या ग्रुप्सवर निर्बंध घातले जातील असे सुद्धा फेसबुकने आपल्या नवीन नियमावलीत स्पष्ट केलं आहे. तर वारंवार नियम मोडणाऱ्या ग्रुपच्या सदस्यांवरही आता कारवाई केली जाईल असं फेसबुककडून सांगण्यात आलं आहे. फेसबुकने आपल्या नवीन नियमाची माहिती एका ब्लॉग पोस्टमध्ये दिली आहे . आपल्या वापरकर्त्यांना धोकादायक कंटेंट असलेले ग्रुप्स यापुढे सुचवले जाणार नाहीत असं कंपनीने नमूद केलंय. शिवाय नियमांचं उल्लंघन करणाऱ्या ग्रुप आणि त्या ग्रुपमधील सदस्यांवर निर्बध घातले जाणार आहेत.

वर्षाभरात टोल घेण्याची व्यवस्था पूर्णपणे रद्द केली जाईल – नितीन गडकरी 

Related Posts
1 of 1,301

धोकादायक कंटेंट पोस्ट करणारे ग्रुप्स इतर सदस्यांना सूचवले जाणार नाहीत याची काळजी घेतली जाणार आहे. वारंवार नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांना मर्यादित कालावधीसाठी कोणत्याही ग्रुपमध्ये पोस्ट करण्यापासून रोखलं जाईल, हा कालावधी ७ ते ३० दिवसांदरम्यान असू शकतो. कारवाई झालेले युजर ग्रुपमध्ये नवीन सदस्यही जोडू शकणार नाहीत किंवा फेसबुकवर नवीन ग्रुपही तयार करू शकणार नाहीत. तसेच वारंवार नियम उल्लंघन करणाऱ्या ग्रुप आणि ग्रुप अ‍ॅड्मिनवरही निर्बंध घातले जातील.

देशात स्थापन होणार तिसरी आघाडी , शरद पवार यांनी दिले संकेत 

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: