“तो” व्हिडिओ तत्काळ डिलीट करण्याचा फेसबुक ने दिली राहुल गांधींना सूचना

0 276

नवी दिल्ली –   काँग्रेस चे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi ) यांना फेसबुक(Face Book)ने आपल्या इन्टाग्राम (Instagram) अकाउंट वरून एक व्हिडिओ डिलीट करण्याची विनंती केली आहे. राहुल गांधी यांनी मागच्या काही दिवसापूर्वी बलात्कार पीडित मुलीच्या पालकांच्या भेटी सबोतचा व्हिडिओ शेअर केला होता. या प्रकरणात नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राइट्स (एनसीपीसीआर) कडून फेसबुकला समन्स मिळाल्यानंतर एका आठवड्यानंतर फेसबुकने राहुल गांधींना व्हिडिओ डिलीट करण्याची विनंती केली आहे. (Facebook instructs Rahul Gandhi to delete “that” video immediately)

काही दिवसांपूर्वी ट्विटरने राहुल गांधींच्या एका ट्विटवर कारवाई केली होती. दिल्लीत एका अल्पवयीन मुलीवर कथित बलात्कार आणि हत्या प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबाचा फोटो राहुल गांधी यांनी पोस्ट केला होता. यावर कारवाई करत ट्विटरने हे ट्विट काढून टाकले. नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राइट्स (एनसीपीसीआर)ने काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ट्विटवर आक्षेप घेत ट्विटर इंडियाकडे तक्रार केली होती. फोटो शेअर केल्यानंतर एनसीपीसीआरने या ट्विटर कंपनीकडे तक्रार केली होती. हे ट्विट बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण (पॉक्सो) कायदा आणि बाल न्याय कायद्याचे उल्लंघन करते एनसीपीसीआरने असा युक्तिवाद केला होता.

हे पण पहा –  मी नव्हे  तो पुन्हा येईल… ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता. 

Related Posts
1 of 1,640

 राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगच्या १० ऑगस्ट २०२१ च्या नोटिसीनुसार, राहुल गांधींच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे अपलोड केलेली पोस्ट बेकायदेशीर आहे. एनसीपीसीआरच्या सूचनेनुसार, ही पोस्ट त्वरित काढून टाकण्याची विनंती केली आहे. यापूर्वी एनसीपीसीआरनेही राहुल गांधी यांच्यावर कारवाई करण्यासाठी ट्विटरला पत्र लिहिले होते. एनसीपीसीआरने यापूर्वी फेसबुकला पत्र लिहून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर राहुल गांधी यांच्या विरोधात कारवाई करण्यास सांगितले होते. तीन दिवसांनंतर, १३ ऑगस्ट रोजी, त्यांनी फेसबुकला समन्स जारी केले. नोटीसला कोणताही प्रतिसाद न दिल्याने त्यांना प्रत्यक्ष उपस्थित राहण्यास सांगितले. त्यानंतर कारवाई करत फेसबुकने राहुल गांधी यांना मेल केला आणि फोटो काढून टाकण्यास सांगितले.जेव्हा फेसबुकने राहुल गांधी यांना पाठवलेल्या मेलची प्रत एनसीपीसीआरला पाठवली, तेव्हा बाल हक्क समितीने त्यांना समन्समधून सूट दिली. (Facebook instructs Rahul Gandhi to delete “that” video immediately)

मामी-भाच्याच्या अनैतिक संबंधातून मामाने केली भाच्याची हत्या

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: