Facebook ने केली डिलीट केली डोनाल्ड ट्रम्प यांची ‘ती’ पोस्ट !

0 37

सोशल मीडियावर कित्येकदा युजर ने टाकलेल्या पोस्ट ऍप कडून डिलीट केल्या जातात.काही नियमांचे उल्लंघन युजरकडून झाले तर पोस्ट डिलीट केल्या जातात. शक्यतो, धोकादायक किंवा हिंसक पोस्ट डिलीट होतात. आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची फेसबुक पोस्ट डिलीट केल्यामुळे खळबळ उडाली आहे.

दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोनाबाबत एक पोस्ट लिहिली होती जी पोस्ट फेसबुकने हटवली.स्वत: कोरोनाशी लढत असलेल्या ट्रम्प यांनी प्लू पेक्षा कोरोना कमी धोकादायक असल्याचा संबंधित पोस्ट मध्ये दावा केला होता.या पोस्टबाबत ट्वीटरकडून हा दावा खोटा असल्याचे सांगण्यात आले आहे तर फेसबुकने तर ट्रम्प यांची ही पोस्टच हटवली आहे.

Related Posts
1 of 253

ट्रम्प यांनी या ट्वीटमध्ये म्हटले होते की-अमेरिकेतील नागरिक फ्लू सोबत जगायला शिकले आहेत. इतकच नाही तर आता कोरोनासोबत जगणंही शिकत आहोत. फ्लूच्या तुलनेत कोरोना कमी धोकादायक आहे. या पोस्टनंतर ट्वीटरने ही पोस्ट हाइड केली असून फेसबुकनं ही पोस्टच हटवली आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: