वडावडापाव गाडी चालकास खंडणीची मागणी
नवरंग व्यायाम शाळेचा परीसर, वेताळ बाबा मंदिराशेजारी, तोफखाना, अ.नगर येथे महानगरपालीकेच्या जागेत वडापावची हातगाडी चालवतो.

नगर : वडापावची (Wadavadapav ) गाडी येथे चालवायची असेल तर दररोज 500 रुपये द्यावे लागतील.अशी खंडणीची मागणी करून फोटो काढण्याच्या कारणावरून शिवीगाळ दमदाटी केल्याची घटना तोफखाना येथील नवरंग शाळेजवळ घडली.
या बाबतची माहिती अशी की पुष्पलता देविदास कोडम ( वय 55 वर्ष रा.पंचरंग गल्ली तोफखाना अ.नगर ) यांचा मुलगा नरेश कोडम हा नवरंग व्यायाम शाळेचा परीसर, वेताळ बाबा मंदिराशेजारी, तोफखाना, अ.नगर येथे महानगरपालीकेच्या जागेत वडापावची हातगाडी चालवतो. वडापावच्या गाड्यासमोर राहणारे पुंडलिक मुनगेल (पुर्णे नाव माहित नाहीत रा. नवरंग शाळेजवळ, तोफखाना, अ.नगर ) हा नवरंग शाळेजवळ येऊन नरेश म्हणाला की, तुला इथे वडापावचा गाडी लावायची असेल तर तुला मला दररोज 500 रुपये दयावे लागतील नाहीतर मी तुला इथे गाडी लावुन देणार नाही असे म्हणुन शिविगाळ केली.
त्या संचालकांचे अज्ञानच समोर येतेय…
त्यानंतर दि.18 रोजी महानगर पालीकेचे अतिक्रमणचे अधिकारी नितीन इंगळे व इतर कर्मचारी असे नवरंग व्यायाम शाळेशेजारी आले व त्यांनी वडापावची हातगाडी अतिक्रमण मध्ये आहे असे सांगुन वडापावची हातगाडी घेवुन गेले. त्यानंतर संतोष मुनगेल यांच्या घराचा जिना हा सुध्दा अतिक्रमण मध्ये आहे हे महानगरपालीका अहमदनगर यांना दाखविण्याकरीता त्याच्या घराच्या बाहेरील जिण्याचा फोटो काढला. त्यानंतर घरातील सर्वजण घरी असताना घराच्या परीसरात राहणारे संतोष मुनगेल हे घरासमोर आले मोठ मोठ्याने शिवीगाळ करुन तुला मारुन टाकतो अशी धमकी देवुन म्हणाला की, तुम्ही माझ्या घराचे फोटो का काढले. असे म्हणुन शिवीगाळ केली.
या प्रकरणी तोफखाना पोलिसांनी पुष्पलता कोडम यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पुडलिक मुनगेल , संतोष मुनगेल ( दोघांचे पुर्ण नाव माहित नाही दोघे रा. नवरंग व्यायाम शाळेसमोर, तोफखाना, अ.नगर ) याच्या विरुध्द खंडणीच्या गुन्ह्यांची नोंद केली असून अधिक तपास तोफखाना पोलिस करीत आहे