
मुंबई : राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली. या घोषणेनंतर शरद पवार यांच्या त्या वाक्याची सर्वांना आठवण झाली. भाकरी फिरवण्याची वेळ आली. या शरद पवार यांच्या वाक्याचा सर्वांना आज उलगडा झाला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाच्या नव्या आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय जाहीर केला.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अपमान – नितीन भुतारे यांचा आरोप…
अध्यक्षपदावरून आपण निवृत्त होत असल्याचे शरद पवार यांनी यावेळी जाहीर करताच उपस्थित कार्यकर्ते आणि नेतेमंडळी भावनिक झाली. यावेळी सभागृहात कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. शरद पवार जोपर्यंत निर्णय मागे घेत नाही, तोपर्यंत आम्ही सभागृह सोडणार नाही, अशी भूमिका घेतली. यावर बोलताना अजित पवारांनी पक्षाची कमिटी जो निर्णय घेईल, तो आम्हाला मान्य असेल, असे शरद पवारांनी सांगितल्याचं जाहीर केले.
शरद पवार यांनी आज लोक माझे सांगाती पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यावेळी केलेल्या भाषणाच्या शेवटी आपण राष्ट्रवादी (NCP) काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले. काही दिवसांपूर्वी भाकरी फिरवण्याची वेळ आली असल्याचे वक्तव्य शरद पवारांनी केले होते. त्यानंतर आता शरद पवारांनी हा निर्णय जाहीर केल्यामुळे हे विधान त्यांच्याच बाबतीत होतं का? अशी चर्चा आता सुरू झाली आहे.