Excitement in the state! Rape of a minor girl at school; Filed a crime Excitement in the state! Rape of a minor girl at school; Filed a crime

प्रतिनिधी DNA टीम 

पुणे –  पुणे शहरातील (Pune City) शिवाजीनगर (Shivajinagar) परिसरात असणाऱ्या एका शाळेमध्ये (School) अकरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर( minor girl ) बलात्कार (Rape) केल्याची धक्कादायक घटना समोर आली. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे. पुणे शहरात काही दिवसांपूर्वीच दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या एका मुलीवर एकतर्फी प्रेमामुळे चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती.  तर आता शाळेमध्ये बलात्कार झाल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे.  (Excitement in the state! Rape of a minor girl at school; Filed a crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल (गुरुवार) दुपारी ११ वाजण्याच्या सुमारास शिवाजीनगर येथील मुलींच्या शाळेत पीडित मुलगी शाळेमध्ये असताना एका ४० वर्षीय अनोळखी व्यक्तीने तिला बोलण्यात फसवून शाळेच्या बाथरूम नेले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. यानंतर संबंधित व्यक्तीने त्या मुलीस या प्रकाराबाबत कोणाला काही सांगितल्यास तुला बघतो, अशी धमकी दिली.

मात्र घडल्य प्रकाराने प्रचंड घाबरलेल्या मुलीने तिच्या कुटुंबियांना याबाबत माहिती दिली. यानंतर मुलीने दिलेल्या तक्रारीवरून संबंधित अनोळखी व्यक्ती विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीचा शोध सुरू असुन, पीडित मुलीकडून अधिक माहिती घेतली जात असल्याचे शिवाजीनगर पोलिसांनी सांगितले.(Excitement in the state! Rape of a minor girl at school; Filed a crime)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *