जिल्ह्यात खळबळ, शिवसेनेचा पदाधिकारीवर बलात्काराचा गुन्हा दाखल

0 403

 अहमदनगर  –  नगर तालुक्यातील जेऊर (Jeur) येथील शिवसेनेचा (Shiv Sena) पदाधिकारी गोविंद मोकाटे (Govind Mokate) यांच्या विरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना समोर आल्याने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. (Excitement in the district, rape case filed against Shiv Sena leader)

मिळालेल्या माहितीनुसार मोकटे हा पीडितेच्या घरी जाऊन बळजबरीने शारीरिक संबंध ठेवत असे जर तू हा प्रकरण कोणाला सांगितले तर तुला आणि तुझ्या मुलांना मारून टाकीन अशी धमकी आरोपी पीडितेला देत होता .

“या” जिल्ह्यात पुन्हा जमावबंदी आदेश, जाणून घ्या संपूर्ण माहिती

त्यामूळे पीडित गुन्हा दाखल करण्यास तयार होत नव्हती. मात्र आज तिने गुन्हा दाखल केला आहे. आरोपीकडून पीडितेला फेसबुक तसेच मोबाईल करुन वारंवार त्रास देणे, अश्लील व्हिडिओ टाकणे तसेच घरी येऊन बळजबरीने त्रास देण्याचा प्रकार दोन वर्षे सुरू होता. आरोपी विरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यांमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तोफखाना पोलीस ठाण्याची पथके मोकाटेला अटक करण्यासाठी रवाना देखील झाली आहे. (Excitement in the district, rape case filed against Shiv Sena leader)

Related Posts
1 of 1,603

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: