जिल्ह्यात खळबळ ..! विजेचा शॉक लागून इसमाचा मृत्यू..

श्रीगोंदा – तालुक्यातील टाकळी कडेवळी येथील आपल्या पाहुण्यांकडे पंढरपूर येथून आलेला दादा राजू रणदिवे (वय 38) याला विजेचा झटका लागून, मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी 8:00 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याबाबत नितीन आप्पा भिसे यांनी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात खबर दिली आहे.
यानंतर मी (नितीन) व युवराज तुकाराम कापरे यांच्या पिकप गाडीतून दादाला मेडिकेअर हॉस्पिटल, श्रीगोंदा येथे सकाळी 8:45 वाजता उपचाराकरता दाखल केले. तर, डॉक्टरांनी त्याला तपासून तो मयत झाल्याचे सांगितले. अशी माहिती मयताचा मेहुणा नितिन भिसे याने पोलिसांना दिली आहे. यानुसार आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.