DNA मराठी

जिल्ह्यात खळबळ ! कांद्याचा भाव पडल्याने शेतकर्याने घेतले विष..

0 421
Excitement in the district! Farmers took poison due to fall in onion prices.

 

अहमदनगर –   कांद्याला भाव दिवसेंदिवस कमी होत चालला आहे. त्यामुळे कांदा उत्पादक अडचणीत आलेले आहेत. कांद्याला चांगला भाव मिळण्याची उत्पादक वाट पहात आहे. यातच अहमदनगर जिल्ह्यात एका शेतकर्याने (Farmer) कांद्याला एक रुपया भाव मिळाल्याने विष प्राशासन करून आत्महत्या करण्याचा प्रत्यन केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे अहमदनगर जिल्ह्यात (Ahmednagar district) एकच खळबळ उडाली आहे. (Excitement in the district! Farmer took poison due to fall in onion prices.)

 

मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील एका गावातील एका शेतकऱ्याने बाजार समितीत कांदे विक्रीस आणले होते.  कांद्याला चांगला भाव मिळेल , अशी आशा त्या शेतकर्याला होती.

 

Related Posts
1 of 2,448

त्याच्या कांद्याला फक्त एक रुपया किलोचा भाव मिळाला. त्यामुळे निराश आणि हताश झाल्याने त्या शेतकर्याने बाजार समितीतच विष प्राशन केल्याची घटना घडली आहे. त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Excitement in the district! Farmer took poison due to fall in onion prices.)

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: