जिल्ह्यात खळबळ; ऊसतोड अभावी शेतकऱ्याने केली आत्महत्या

0 245
Excitement in the district; Farmer commits suicide due to lack of sugarcane

प्रतिनिधी- DNA मराठी टीम 

अहमदनगर – अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव (Shevgaon) तालुक्यातील जोहरापुर येथे ऊसतोड अभावी एका शेतकऱ्याने(farmer) विषारी औषध घेऊण आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जनार्धन सिताराम माने (वय ७०) असं मयत शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांनी अगोदर ऊसतोड मिळत नसल्याने ऊसाला आग लावली आणि त्यानंतर विषारी औषध घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे अतिरिक्त ऊसाचा प्रश्न  ऐरणीवर आल्याने परिसरातील शेतकऱ्यात साखर कारखान्याच्या विरोधात संताप निर्माण झाला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार शेवगाव तालुक्यातील जोहरापुर येथील जनार्धन सिताराम माने (वय ७०) या वृद्ध शेतकऱ्याने चकरा मारूनही आपल्या ऊसाला तोड मिळत नसल्याने मंगळवार रोजी दुपारी २ वाजता स्वताःच्या हाताने ऊसाला आग लावली व नैराशातुन ऊसाच्या फडात विषारी औषध घेतले. त्यांना उपचारार्थ शहरातील नित्यसेवा रुग्णालयात दाखल केले असता बुधवार दि.६ रोजी दुपारी उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यु झाला. या घटनेने साखर कारखाना विरोधात शेतकऱ्यांत संतापाची लाट उसळली असून शेतकऱ्यांना ऊसतोडीसाठी चरखात पिळल्यासारखे पिळून घेणाऱ्या साखर कारखान्याबाबत चीड निर्माण झाली आहे.

मयत जनार्धन माने हे खामगाव शिवारात गट नं.९ मध्ये  उभा असणाऱ्या आपल्या पावणे तीन एकर ऊसाला तोड मिळावी यासाठी महिन्यापासून कार्यक्षेत्रातील कारखान्याकडे चकरा मारत होते पंरतु त्यांना फक्त पुढची तारीख दिली जात होती. गयावया करूनही ऊसतोड लाबंत चालल्याने गाळप अभावी ऊस उभाच राहतो कि काय या नैराशाने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा जबाब मयत शेतकरी यांचा मुलगा संतोष जनार्धन माने यांनी  पोलिसांना दिल्याची माहिती आहे.
शेवगाव तालुका कार्यक्षेत्रात चार ऊस कारखाने असुनही कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यास ऊसतोड अभावी आत्महत्या करावी लागली ही मोठी शोकांतिक झाली असुन यामुळे अतिरिक्त ऊसाचा प्रश्ण आता ऐरणीवर येत आहे. बाबत पोलिसांनी अकस्मात मृत्युची नोंद केली आहे .
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: