श्रीरामपूर मध्ये खळबळ! लॉजमध्ये आढळला मृतदेह; तपास सुरु

अहमदनगर – अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर (Shrirampur) शहरामध्ये असणाऱ्या सूर्या लॉजमध्ये (Surya Lodge) बोरीवली परिसरातील ५२ वर्षीय पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. उमर मेहबूब शेख असं मुत्यू झालेल्या व्यक्तीचा नाव आहे. १५ मार्चपासून शेख या लॉजमध्ये थांबले होते.त्यांचा मृत्यू कशामुळे आणि केव्हा झाला हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. मृतदेह कुजला असल्याने परिसरात दुर्गंधी पसरल्यावर हे गोष्ट लक्षात आली.
पोलिसांनी लॉजच्या खोलीचा दरवाजा तोडून मृतदेह ताब्यात घेतला आहे. तेथे आढळून आलेल्या कागदपत्रांवरून मृतदेहाची ओळख पटली असली तरी नातेवाईकांशी अद्याप संपर्क झालेला नाही. शेख तीन दिवसांपासून बाहेर आले नव्हते. त्यानंतर त्यांच्या रूममधून कुजलेला असा वास येऊ लागला. त्यामुळे लॉज मालकांनी श्रीरामपूर शहर पोलिसांना माहिती दिली.
Related Posts
पोलिसांनी लॉजवर येऊन खोलीचा दरवाजा तोडला. आतमध्ये कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह होता. खोलीत औरंगाबाद येथील एका रुग्णालयाची फाईल आढळून आली. त्यावरून शेख तेथे उपचार घेण्यासाठी गेले असावेत, असा अंदाज आहे. तेथे मिळालेल्या अन्य कागदपत्रांवरून ओळख पटली. पोलिसांनी नातेवाईकांशी संपर्क करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेऊन रुग्णलयात तपासणीसाठी पाठविला आहे. कुजल्याने मृतदेहाची अवस्था अत्यंत वाइट झाली असून परिसरात दुर्गंधी पसरली आहे. अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.